IND vs NZ : विराटच्या चिंता वाढल्या, पहिल्याच सराव सामन्यात सलामीचे फलंदाज फेल

IND vs NZ : विराटच्या चिंता वाढल्या, पहिल्याच सराव सामन्यात सलामीचे फलंदाज फेल

बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या सलामीवीरांनी टाकली नांगी.

  • Share this:

ओव्हल, 25 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपकरिता आता केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. दरम्यान, आज भारतीय संघ आपला पहिला सराव सामना न्युझीलंड विरोधात खेळत आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं प्रथम टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त असलेला विजय शंकर आणि आता दुखापतीतून सावरलेला केदार जाधव यांना संघात स्थान देण्यात आले नाही आहे. त्यामुळं चौथ्या क्रमांकावर केएल राहुलला खेळवण्यात आले.

एकीकडे चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, पहिल्या सराव सामन्यात सलामी फलंदाजांनीच नांगी टाकली. पहिल्या तीन ओव्हरमध्येच भारताचे सलामीवीर माघारी परतले. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची सलामीची जोडी जगातल्या सर्वोत्कृष्ठ जोडींमध्ये गणली जाते. मात्र सराव सामन्यात त्यांना कमाल करता आली नाही.

भारतीय संघातील सर्वच खेळाडू जवळजवळ गेले 2 महिने आयपीएल खेळले आहेत. त्याआधी आस्ट्रेलियाविरोधात 5 एकदिवसीय सामने, टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यामुळं तब्बल 2-3 महिन्यांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाचा भारताबाहेर खेळणार आहे. याचेच परिणाम पहिल्या सराव सामन्यात दिसले.

ट्रेन्ट बोल्टच्या जलद गोलंदाजीसमोर सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. बोल्टनं रोहित शर्माला एलबीडब्लु आऊट केले. रोहितनं केवळ 2 धावा केल्या. रोहितनं सराव सामन्यात रिव्ह्युही घेतला मात्र त्यांनतर, लगेचच शिखर धवनही बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिखर धवन ही 2 धावा करत बाद झाला. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी बोल्टच्या जलद गोलंदाजीसमोर जणु लोटांगण घातले. त्यामुळं पुढील सराव सामन्यात भारत या चुकांमधून शिकेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान भारतीय संघाचा दुसरा सराव सामना 28 मे रोजी बांगलादेश विरोधात होणार आहे. तर, भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जूनला मैदानात उतरणार आहे.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 25, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading