World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

ICC Cricket World Cup : मोहम्मद शमीने सलग दोन सामन्यात प्रत्येकी 4 बळी घेण्याची कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : भारताने वर्ल्ड कपमध्ये सहापैकी 5 सामन्यात विजय मिळवून 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 268 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या वेस्ट इंडीजचा 143 धावांत धुव्वा उडाला. भारताच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजचे स्फोटक फलंदाज तग धरू शकले नाहीत. मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. त्याने ख्रिस गेल, शाय होप, शिम्रॉन हेटमायर आणि कॉट्रेलला बाद करून विंडीजच्या फलंदाजीची हवाच काढून घेतली.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या. विराट कोहली वगळता इतर फलंदाज वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण राहुल बाद झाल्यानंतर विजय शंकरसुद्धा 14 धावांवर बाद झाला. विजय शंकरनंतर केदार जाधव धोनीच्या आधी फलंदाजीला आला. तो फक्त 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीची सुरुवात अडखळत झाली. त्याला 8 धावांवर असताना जीवदान मिळाले.

वेस्ट इंडिडच्या आधी भारताने अफगाणिस्तानला पराभूत करून चौथा विजय मिळवला होता. त्या सामन्यात भारताने 224 धांवांचे रक्षण करत 11 धावा आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. तरीही त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. शमीने 9.5 षटकांत 40 धावांत 4 बळी घेतले होते.

मोहम्मद शमीला भुवनेश्वरच्या जागी संघात घेतलं. भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे काही सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. तो तंदुरुस्त झाला असला तरी पुढच्या सामन्यांच्या दृष्टीने त्याला विश्रांती दिली आहे.

World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

First published: June 27, 2019, 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading