हेडिंग्ले, 06 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्या सामन्यात एका गोष्टीने वाद निर्माण झाला. सामन्यावेळी हेडिंग्ले स्टेडियमवरून एक विमान गेलं. यावर जस्टिस फॉर काश्मिर असं पोस्टर लावण्यात आलं होतं. वर्ल़्ड कपमध्ये असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. याआधी अफगाणिस्तान पाकिस्तान सामन्यावेळी असं झालं होतं. त्यावेळी जस्टिस फॉर बलूचिस्तान आणि पाकिस्तानातून बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करा असा संदेश देण्यात आला होता.
आयसीसीने भारत लंकेच्या सामन्यावेळी घड़लेल्या प्रकाराची दखल घेतली आहे. आयसीसीने म्हटलं आहे की याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. आम्ही पोलिसांची मदत घेऊन असे प्रकार थांबवण्याचं काम करू.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामन्यात झालेल्या घटनेनंतरही आयसीसीने स्पष्टीकरण दिलं होतं. तेव्हा स्थानिक पोलिसांच्या मदतीनं चौकशी सुरू असून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत असंही आय़सीसीने म्हटलं होतं.
— Ch Ansar Ghűmmãn✌ (@AnsarGhuman1111) July 6, 2019
आम्ही कोणत्याही प्रकारचा राजकीय संदेश देत नाही किंवा त्याचं समर्थन करत नाही. वेस्ट य़ॉर्करशायर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं असून ते चौकशी करत आहेत असं आयसीसीने सांगितलं आहे.
VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!