VIDEO:विराट बाद झाला नाही, त्याला बाद केला; पाहा अफलातून कॅच!

VIDEO:विराट बाद झाला नाही, त्याला बाद केला; पाहा अफलातून कॅच!

दक्षिण आफिकेने दिलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

साउथॅम्पटन, 05 जून : दक्षिण आफिकेने दिलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना भारताला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिखर धवन बाद झाल्यानंतर आफ्रिकेने विराट कोहलीला बाद केले आहे. वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि आफ्रिकेला केवळ 227 धावात रोखले. पण आफ्रिकेने सुरुवातीलाच भारताला दोन धक्के दिले आहेत. यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे कर्णधार विराट कोहलीला बाद करण्याचा होय.

भारताची मदार असलेल्या विराट कोहलीला एंडिले फेलुक्वायो याने 18 धावांवर बाद केला. भारताची ही महत्त्वाची विकेट घेण्यात एंडिले याच्यापेक्षा विकेटकिपर डी कॉकने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डी कॉकने हवेत झेप घेत अप्रतिम असा झेल पकडला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 50 षटकांत 9 बाद 227 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केलं. आफ्रिकेटचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले.

वाचा- आफ्रिकेला झालंय तरी काय? कर्णधार म्हणतो 'या' गोष्टीचा फटका

आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेला हा निर्णय महागात पडला. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेला दणका दिला. पहिल्या दहा षटकांत जसप्रीत बुमराहने तर 20 व्या षटकात युझवेंद्र चहलनं आफ्रिकेच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवलं. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांना बुमराहनं आपल्या तीन षटकांत माघारी धाडलं. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला.

World Cup : चहलचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी', 'लगान'च्या कचराची आठवण करून देणारा VIDEO

तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणाऱी जोडी युझवेंद्र चहलनं फोडली. त्यानं पहिल्यांदा रॉसी वान डेर डुसेन नंतर डुप्लेसीला बाद केलं. त्याच्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने जेपी ड्युमिनीला बाद करून आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातलं. त्याने आफ्रिकेच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं. डुप्लेसी, डुसे यांच्यानंतर डेव्हिड मिलर आणि अँडिल पेहलुक्वायोला चहलने बाद केलं.

First published: June 5, 2019, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading