India vs South Africa भारताची विजयी सलामी, हिटमॅनचे शतक

India vs South Africa भारताची विजयी सलामी, हिटमॅनचे शतक

चहलच्या 4 विकेटनं मोडले दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे. भारतापुढे सोपे आव्हान India National Cricket Team vs South Africa National Cricket Team ICC Cricket World Cup 2019 at The Rose Bowl Southampton.

  • Share this:

साऊदमप्टन, 05 मे : हिटमॅन रोहित शर्माचं संयमी शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून वर्ल्ड कपला दमदार सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. त्याला रबाडाने बाद केलं. धवनने 8 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसुद्धा 18 धावा काढून बाद झाला. भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज केएल राहुलने रोहित शर्मासोबत 85 धावांची भागिदारी केली. केएल राहुलला राबाडाने बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर रोहित शर्मा आणि धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली. विजयासाठी 13 धावा हव्या असताना धोनी बाद झाला. त्यानंतर पांड्या आणि रोहित शर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी, डेव्हिड मिलर, अँडी पेहलुक्वायो आणि ख्रिस मोरिस यांना 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या. सलामीवीर हाशिम आमला आणि क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाले. पहिल्या ओव्हरपासून भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नियंत्रण ठेवले. बुमराहनं आपल्या तीन ओव्हरमध्येच दक्षिण आफ्रिकाच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडले. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला. तर, अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर चहलनं ड्युप्लेसिस आणि रॉसी वान डेर डुसेन यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी पाठवले. त्यानंतर कुलदीपनं जेपी ड्युमिनीलाही माघारी धाडले. मात्र त्यानंतर आपल्या संघाला डेव्डिड मिलर आणि एंडिले फेलुक्वायो यांनी संयमी फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर धोनीनं धान साधत एंडिले फेलुक्वायोला बाद केले. भारताकडून चहलनं 4, कुलदीप यादवनं आणि भुवनेश्वर कुमारनं, बुमराहनं 2 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तळाला आलेल्या क्रिस मॉरिसनं सर्वात जास्त धावा केल्या. तर, कर्णधार ड्यु प्लेसिसिनं 38 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या