World Cup : पाकिस्तानची धुलाई करत विराटसेनेने केले 'हे' 10 रेकॉर्ड

पाकिस्तानला नमवतं भारतीय संघानं आपल्या नावावर दहा रेकॉर्डची नोंद केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 02:18 PM IST

World Cup : पाकिस्तानची धुलाई करत विराटसेनेने केले 'हे' 10 रेकॉर्ड

भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतानं 89 धावांनी पाकिस्तानला नमवलं. भारतीय संघानं ही अशी पहिली कामगिरी पहिल्यांदा केलेली नाही, तर आतापर्यंत तब्बल सात वेळा पाकिस्तानला पाणी पाजले आहे.

महेंद्रसिंग धोनीनं पाकिस्तानच्या विरोधात आपला 341वा एकदिवसीय सामना खेळला. यासह सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर आहे. याआधी राहुल द्रविडनं 341 एकदिवसीय सामने खेळले होते.

तर, रोहित शर्मानं महेंद्रसिंग धोनीचा सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीनं 355 षटकार लगावले होते, तर रोहितच्या नावावर आता 358 षटकार आहेत.

Loading...

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं पाकिस्तानला नमवण्याचा रेकॉर्ड कायम राखला आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानला 1992च्या वर्ल्ड कपमध्ये 43 धावांनी, 1996 साली 39 धावांनी, 1999 मध्ये 47 धावांनी, 2003 मध्ये 6 विकेट्सने, 2011मध्ये 29 धावांनी आणइ 2015 मध्ये 76 धावांनी पराभूत केले होते. यात विराटसेननं 10 रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.

20 वर्षांआधी भारतीय संघानं पाकिस्तान संघाला मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड मैदानावर पराभूत केलं होतं. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला 43 धावांनी पाकिस्तानला नमवलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा 336 हा सर्वोत्तम धावा होत्या. याआधी 2015मध्ये भारतानं पाकिस्तानला 301 धावांचे आव्हान दिले होते.

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरोधात सलग दुसरे शतक करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी आशिया चषक 2018मध्ये रोहितनं पाकिस्तानविरोधात शतकी खेळी केली होती.

रोहित शर्मा- केएल राहुल या सलामी जोडीच्या नावावर पाकिस्तान विरोधात सर्वात जास्त भागिदारी करण्याच्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित-राहुलनं 136 धावांची भागिदारी केली आहे.

वर्ल्ड कपमधला पहिला सामना खेळणारा विजय शंकर याच्या नावावर मोठा रेकॉर्ड आहे. पहिल्याच सामन्यात आपल्या पहिल्याच चेंडूवर त्यानं विकेट घेतली. असं करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्याचा विक्रम केला. सर्वात कमी सामन्यात असं करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे, त्यानं केवळ 222 सामन्यात ही कामगिरी केली.

टॉसच्या बाबतीतही एक अनोखा रेकॉर्ड झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात पहिल्यांदाच टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...