World Cup : सर्फराजनं ऐकला नाही पंतप्रधानांचा सल्ला, एका निर्णयामुळं झाला पाकचा पराभव

पाकिस्ताननं आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 03:21 PM IST

World Cup : सर्फराजनं ऐकला नाही पंतप्रधानांचा सल्ला, एका निर्णयामुळं झाला पाकचा पराभव

मॅंचेस्टर, 17 जून : ICC World Cup 2019मध्ये भारतानं पाकिस्तानला नमवतं, आपली विजयी घौडदौड सुरु ठेवली आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान यानं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पाकिस्तानला महागात पडला कारण पहिल्या विकेटसाठी रोहत शर्मा आणि केएल राहुल यांनी तब्बल 136 धावांची भागिदारी केली. यात दोन्ही खेळाडूंच्या अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळं गोलंदाजांना संघावर तबाव टाकता आला नाही. त्यातच ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळं तब्बल तीनवेळा रनआऊटची संधी हुकली. त्यामुळं भारतीय संघानं 336 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजांना हे आव्हान पार करता आले नाही.

पाकिस्तानच्या पराभवाला चाहत्यांनी सर्फराजला कारणीभूत ठरवले आहे. सर्फराजनं नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय संघाला महागात पडल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर, पाकिस्तानचे पूर्व कर्णधार आणि पंतप्रधान इमरान खान यांनी, सामन्याआधीच सर्फराजला टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सर्फराजनं पंतप्रधानांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका संपूर्ण संघाला बसला.

1992मध्ये पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार इमरान खान यांनी भारत-पाकिस्तान सामन्याआधी ट्विट केले होते. त्यांनी या ट्विटमध्ये, जेव्हा मी माझे क्रिकेट करिअर सुरु केले होते. तेव्हा मी 70 टक्के प्रतिभा आणि 30 टक्के मानसिकता यांच्या जोरावर खेळायचो. त्यामुळं खेळताना मानसिकता खुप महत्त्वाची आहे. तसेच त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये, सर्फराज हा बोल्ड फलंदाज आहे. पण पाकिस्ताननं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करावी, असे ट्विट केले होते.Loading...

परिणामी पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज खान यानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला, मुख्य म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने देखील गोलंदाजीची इच्छा बोलून दाखवली होती. पण भारतानं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 337 धावांचे आव्हान दिले. यात रोहित शर्माची 140 धावांची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर पाकिस्तानला मोठा झटका बसला. परिणामी भारतानं 89 धावांनी हा सामना जिंकला

सर्फराज बिनडोक कर्णधार

पाकिस्तानच्या खेळाडूंच्या या सगळ्या स्थितीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर यानं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज खान याला जबाबदार ठरवले आहे. शोएरबनं आपल्या यु-ट्युब चॅनलवरुन भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केलं आहे. शोएबच्या मते पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतले पाहिजे होता. त्यानं, भारतीय संघाविरोधात पाकिस्तानच्या संघानं एवढ्या वर्षात कधी आव्हानाचा पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळं सफराजनं आपलं डोक चालवायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया दिली. शोएबनं या व्हिडिओमध्ये, "आमची मॅनेजमेंट पागल आहे आणि आमचा कर्णधार मामू बनला आहे. त्याला काही कळत नाही. तो म्हणजे 10वीच्या वर्गातला मुलगा आहे, त्याला बाकी जे सांगतील तेवढेचं तो करतो'', अशी जहरी टीका केली आहे.


वाचा-World Cup : आमचा कर्णधार बिनडोक, शोएबची सर्फराजवर जहरी टीका

वाचा- World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन!

वाचा- VIDEO : INDvsPAK : गोलंदाजांची धुलाई सुरू असताना पाकच्या कर्णधाराला आली झोप!

वाचा-World Cup : ....तरच मी पाकिस्तानच्या फलंदाजांना सल्ला देणार, रोहितचा क्लिन स्वीप


VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...