IND vs PAK : सचिन आणि गांगुलीनं विराटला दिला कानमंत्र, 'ही' एक चूक पडू शकते महागात

IND vs PAK : सचिन आणि गांगुलीनं विराटला दिला कानमंत्र, 'ही' एक चूक पडू शकते महागात

'पाकिस्तान विरोधात खेळणे ही एक पर्वणी असते, त्यामुळं भारतीय संघानं आपला सर्वोत्तम खेळ करावा'

  • Share this:

मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cupमध्ये आज भारत-पाकिस्तान हे दोन संघात आज क्रिकेटच्या मैदानात लढत होणार आहे. खरतर हा सामना वर्ल्ड कपमधच्या अंतिम सामन्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण आतापर्यंत एकदाही पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना गमवलेला नाही. पण याच पाकिस्तानच्या संघाने चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला कमी लेखण विराटसेनेसाठी धोक्याचे ठरेल. मँचेस्टर पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे या सामन्यात देखील पावसाचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पण असे असले तरी हा सामना रद्द होणार नाही. त्यामुळं या सामन्यात विराटसेनेला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याआधी भारताचा पुर्व कर्णधार सौरव गांगुली आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी विराटसेनेला महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. गांगुलीनं, “भारताला पाकिस्तानविरोधात सावध खेळ करावा लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं ती चूक केली होती. त्यामुळं विराटपुढे आव्हान असणार आहे ते, आपली खेळी सर्वोत्तम करणे”. याच बरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भारतानं पाकिस्तान संघाला कमी लेखू नये, असा सल्ला दिला आहे. सचिननं, “पाकिस्तानचा संघ नेहमीच खतरनाक संघ राहिला आहे. त्यामुळं त्यांना कमी लेखनं भारताला महागात पडेल. भारतीय संघानं आत्मविश्वसानं खेळायला हवे’’, असा कानमंत्र विराटला दिला.

दरम्यान गांगुलीनं, “दोन्ही देशातली सामने हे नेहमीच हायवोल्टेज असतात कारण लोकांच्या अपेक्षा असतात. मात्र आता सध्या खेळाडूंचे लक्ष हे त्यांच्या खेळावर असले पाहिजे”, असा सल्ला दिला.

पाकिस्तान विरोधात खेळणे ही पर्वणी

गांगुलीनं पाकिस्तान विरुद्ध सामन्याच्या आठवणींना एक कार्यक्रमादरम्यान उजाळा दिला. 2003-04मध्ये गांगुली कर्णधार म्हणून पहिल्यांदा पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी भारतानं एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. तसेच, सचिननं 2003च्या वर्ल्ड कपमधल्या आपल्या 98 धावांच्या खेळी ही सर्वोत्तम खेळी असल्याचे मत व्यक्त केले. भारत-पाकिस्तान सामना हा खुप मजेशीर असतो, कारण सर्वांच्या नजरा तुमच्यावर असताता, असेही सचिन म्हणाला.

वाचा-चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार नाही पण...

वाचा- World Cup India vs Pakistan: या ठिकाणी पाहू शकता तुम्ही Live सामना

वाचा- World Cup : इथं 20 वर्षांनी भारत-पाक लढत, वाचा कशी असेल खेळपट्टी आणि हवामान

World Cup: IND vs PAK; परंपरा राखा विजयाशी, धूळ चारुनी करा सरशी...

First published: June 16, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading