World Cup : चाहत्यांना मोठा धक्का, पावसामुळं 'हा' हायवोल्टेज सामनाही होऊ शकतो रद्द

आयसीसीनं राखीव दिवस न ठेवल्यामुळं पावसामुळं सामने रद्द होत आहेत. आतापर्यंत तब्बल चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 08:23 PM IST

World Cup : चाहत्यांना मोठा धक्का, पावसामुळं 'हा' हायवोल्टेज सामनाही होऊ शकतो रद्द

ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये विराट सेनेनं आतापर्यंत एकही सामन्यात पराभव पत्करलेला नाही. दरम्यान भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार होता, मात्र भारताच्या विजयावर पावसानं पाणी फेरले. हा सामना रद्द झाल्यामुळं भारत आणि न्यूझीलंड यांना एक-एक गुण मिळाला आहे. सध्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारतीय संघ 5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र हा सामना रद्द झाल्यामुळं आयसीसीवर चाहते नाराज आहे. भारताचा पुढचा सामना हा रविवारी पाकिस्तान विरोधात होणार आहे. जर या हायवोल्टेज सामन्याला पावसाचा फटका बसला तर, चाहते आयसीसीवर चांगलेच भडकतील.

वर्ल्ड कपच्या इतिहासातला भारत आणि न्यूझीलंडचा हा चौथा सामना आहे, जो रद्द झाला. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.

आयसीसीवर ओढावली नामुष्की

पावसाचामुळं रद्द झालेल्या सामन्याचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयसीसीवर टीका होताना दिसत आहे. पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहतेही विचारत आहेत. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी, ''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'', असे स्पष्टीकरण दिले आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यालाही बसणार पावसाचा फटका

Loading...

वर्ल्ड कपमधला हाय वोल्टेज सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी ट्रैफोर्डच्या मैदानावर पावसाची शक्यता आहे. जर रविवारी पाऊस पडला तर, चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीटं अगदी 48 तासांत विकल्या गेल्या होत्या. आतापर्यंत सहावेळा भारत पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडले आहेत, याच एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.


VIDEO : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना पावसाळ्याची भेट, महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...