World Cup : पाकिस्तानला झटका देणाऱ्या कुलदीपच्या ड्रीम बॉलची चर्चा, नेटकऱ्यांनी केली दिग्गजासोबत तुलना

World Cup : पाकिस्तानला झटका देणाऱ्या कुलदीपच्या ड्रीम बॉलची चर्चा, नेटकऱ्यांनी केली दिग्गजासोबत तुलना

कुलदीपचा हा चेंडू या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पण त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 18 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी पाकिस्तानला नमवले. या सामन्यात रोहित शर्माच्या 140 धावांच्या खेळीपेक्षा जास्त चर्चा रंगली ती कुलदीप यादवच्या गोलंदाजीची. कुलदीपच्या बॉल ऑफ द सेंच्युरीच्या जोरावर त्यानं पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आजम याला क्लिन बोल्ड़ केले, या विकेटमुळं सामन्याला कलाटणी मिळाली. 48 धावांवर बाद झालेल्या बाबरला या चेंडूचा अंदाज आला नाही.

कुलदीपच्या या विकेटला 'ड्रीम डिलिव्हरी' असे नाव नेटेकऱ्यांनी दिले आहे. कुलदीपनं हा चेंडू 78 किमी प्रति तासाच्या वेगानं टाकला होता. चेंडूचा ऑफ स्टम्पच्या बाहेर पहिला टप्पा पडला होता त्यानंतर चेंडू आत घुसला. हा चेंडू 5.80च्या अंशानं फिरला, त्यावेळी चेंडूची गती कमी असल्यामुळं बाबरला चेंडूचा अंदाज आला नाही. चेंडू बॅट आणि स्टम्पमधून गेला. मुख्य म्हणजे कुलदीपच्या या विकेटची तुलना नेटकरी शेन वॉर्नच्या बॉल ऑफ द सेंच्युरीशी करत आहेत. शेन वॉर्नचा तो चेंडू 14 अंशानं फिरला होता, त्यावर त्यानं माईक गेटिंगची विकेट घेतली होती. त्यामुळं नेटकरी सध्या कुलदीपच्या त्या विकेटची चर्चा करत आहे.

सामन्यानंतर कुलदीपनं या विकेट मागचे रहस्य सांगितले. "पाऊस थांबल्यानंतर मी चेंडू पाहिला होता. तेव्हा कळलं की चेंडू ड्रिफ्ट होत आहे, त्यानंतर टर्न घेत आहे. एखाद्या स्पिनरसाठी ही वेळ म्हणजे ड्रीम टाईम असते", असे सांगत चायनामॅन नावानं प्रसिध्द असलेल्या कुलदीपनं, "ही माझ्यासाठी ड्रीम डिलिव्हरी होती". कुलदीपनं आशिया चषकातही बाबर आझमला बाद केले होते. तर, आयपीएलमध्ये त्याची गोलंदाजी सपशेल फेल ठरली होती, त्यामुळं त्याच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र पाकिस्तान विरोधात त्यानं दोन विकेट घेतल्या.

विराटनं केलं चायनामॅनचं कौतुक

कुलदीपच्या या विकेटचं कौतुक शेन वॉर्ननेही केले. तर, कर्णधार विराट कोहलीनं कुलदीपचे कौतुक करत, "बाबरला ज्या चेंडूवर आऊट केले तो सर्वोश्रेष्ठ चेंडू होता. इंग्लंडमध्ये कुलदीप उत्कृष्ठ गोलंदाजी करत आहे", असे मत व्यक्त केले.

वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही'

वाचा-World Cup : इंग्लंडची चिंता वाढली, ऐन वर्ल्ड कपमध्ये बदलावा लागणार कर्णधार

वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

First published: June 18, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading