IND vs PAK : पाऊस पडल्यास पाकिस्तानला बसणार धक्का, विराटसेनेला फायदाच

भारत-पाकिस्तान सामन्यात हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मॅंचेस्टरमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 02:07 PM IST

IND vs PAK : पाऊस पडल्यास पाकिस्तानला बसणार धक्का, विराटसेनेला फायदाच

मॅंचेस्टर, 14 जून : ICC World Cupमध्ये यंदा पावसामुळं तब्बल चार सामने रद्द झाले. त्यामुळं भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. मात्र, याचा फटका संघांना लीग स्टेजमध्ये बसू शकतो. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना हा रविवारी पाकिस्तान विरोधात होणार. मात्र, या हायवोल्टेज सामन्यावरही आता पावसाचे ग्रहण आहे.

यंदाच्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यात गुरुवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही आता रद्द झाल्यामुळं चाहते आयसीसीवर संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मॅंचेस्टरमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पावसाची शक्यता 50 % आहे. सकाळपासून-संध्याकाळपर्यंत या शहरात पाऊस पडण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तसेच, 16 जूनला म्हणजे सामन्यादिवशी दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. रविवारी सकाळी 9, 11 आणि दिवसभरात तीनवेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, इंग्लंडमध्ये जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा याच मॅंचेस्टर शहरात पडला आहे. त्यामुळं या सामन्याला पावसाचा फटका बसणार असे चित्र दिसत आहे.

सामना रद्द झाला तर भारताला फायदा

भारत-न्यूझीलंड यांच्यातला सामना रद्द झाला तरी, भारतीय संघाला याचा फायदा होणार आहे. गुणतालिकेवर एक नजर टाकल्यास भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरोधात चांगला विजय मिळवला आहे. त्यामुळं भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा संघ सात गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहेत. त्यातील सहा सामने जिंकल्यास त्या संघांना थेट सेमीफायनलचे तिकीट मिळणार आहे. त्यात भारताचे केवळ 3 सामने झाले आहेत. त्यात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन सामन्यात भारताचे पारडे जड असल्यामुळं भारताचा विजय जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळं पाकिस्तान विरुद्धचा सामना झाला नाही तरी भारताला फटका बसणार नाही.

Loading...

पाकिस्तानसाठी असेल धोक्याची घंटा

पाकिस्तानचा संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांना आतापर्यंत दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे, त्याचा फटका त्यांना बसू शकतो. 4 सामन्यात त्यांचे सध्या 3 गुण आहेत. त्यामुळं सेमीफायनल गाठण्यासाठी त्यांना रविवारचा सामना जिंकावा लागेल.

भारत आणि पाकिस्तानचा हा सामना पाहिलात का?


वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

वाचा- 'भारताला हरवणे सोपे', वकार युनिसनं पाकिस्तानला कानमंत्र दिला

वाचा-पाकिस्तानला हरवण्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज, कोहलीनं सांगितली स्ट्रॅटर्जी


मुसळधार पावसाचा धुमाकूळ; दरड कोसळून अनेक कारचा चुराडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 01:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...