Elec-widget

IND vs NZ : आज पाऊस थांबलाच नाही तर काय होणार?

IND vs NZ : आज पाऊस थांबलाच नाही तर काय होणार?

डकवर्थ लुईस नियमानुसार जर पाऊस काही वेळानं थांबला तर भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 09 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सुरु असलेल्या भारत-न्यूझीलंड यांचा सामना पावसामुळं थांबला आहे. न्यूझीलंडचा सामना 46.1 ओव्हरमध्ये 211 धावांवर थांबला. त्यामुळं जर पाऊस काही वेळानं थांबला तर भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं जर, सामना 40 षटकांचा झाला तर भारताला 6च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.

दरम्यान न्यूझीलंडनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णयावर भारतीय गोलंदाजांनी पाणी फेरले. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहनं गुप्टिलला माघारी धाडले. न्यूझीलंडन या सामन्यात खुपच धिमी फलंदाजी केली. 40 ओव्हरनंतर त्यांनी पहिल्यांदा रनरेटमध्ये 4चा आकडा गाठला. दरम्यान पावसामुळं 47व्या ओव्हरमध्ये पंचांनी सामना थांबवला. सध्या रॉस टेलर 67 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं 67 धावा केल्या. तर, भारताकडून भुवनेश्वर कुमार, चहल, जडेजा, बुमराह यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

पाऊस थांबलाच नाही तर काय होणार

दरम्यान पावसाचा जोर वाढला आणि आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना सुरू होणार आहे. आयसीसीकडून सेमीफायनल सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळं सामना दुसऱ्या दिवशी 46.1 ओव्हरपासून सुरु होईल. असाच प्रकार 1999मध्ये आणि 2002च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये घडला होता.

रिझर्व्ह डेवरही पावसाचे सावट

याआधी साखळी सामन्यातील तब्बल चार सामने पावसामुळं रद्द झाले होते. त्यामुळं सेमीफायनलमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आला. भारत-न्यूझीलंड यांचा सामना मंगळवारी पावसामुळं रद्द झाल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र बुधवारी राखीव दिवसावरही पावसाचे सावट आहे. ण इंग्लंडमधील हवामानाच्या अंदाजानुसार या दोन्ही दिवशी ज्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार तिथं ढगाळ वातावरण राहणार असून सामन्यावर पावसाचं सावट आहे.

वाचा- पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

वाचा- World Cup: हिटमॅन विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर; सचिनला टाकणार मागे?

वाचा- World Cup : न्यूझीलंडची अवस्था 11 वर्षापुर्वी होती तशीच, भारत जाणार फायनलमध्ये!

#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...