Ind vs Nz : इंग्लंडच्या भूमीत भारत खेळणार पहिला सराव सामना, केदार जाधव मिटवणार विराटची चिंता ?

जवळजवळ तीन महिन्यांनंतर भारतीय संघ परदेशात खेळणार आहे. दरम्यान या सामन्यात भारताच्या चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 01:56 PM IST

Ind vs Nz : इंग्लंडच्या भूमीत भारत खेळणार पहिला सराव सामना, केदार जाधव मिटवणार विराटची चिंता ?

इंग्लंड, 25 मे : विश्वचषकाला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला असताना, सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान भारत यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 30मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र असे असले तरी, आज भारत न्युझीलंड विरोधात आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंना इंग्लंडच्या परिस्थितीचा अंदाज येईल. त्यामुळं हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना भारताला वर्ल्ड चॅम्पियनही बनवू शकतो.

इंग्लंडच्या परिस्थितीशी होणार सामना

भारतीय संघातील सर्वच खेळाडू जवळजवळ गेले 2 महिने आयपीएल खेळले आहेत. त्याआधी आस्ट्रेलियाविरोधात 5 एकदिवसीय सामने, टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यामुळं तब्बल 2-3 महिन्यांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाचा भारताबाहेर खेळणार आहे. मात्र, इंग्लंडची पीच भारतासारखी फ्लॅट असली तरी, हवामान आणि इतर गोष्टी वेगळ्या आहे. त्यामुळं न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताला परिस्थितीचा अंदाज येईल.

संघाचे संयोजन करण्याचा असेल प्रयत्न

भारतीय संघाचा पहिला सराव सामना असल्यामुळं संघ बांधणीबरोबरच, संघ संयोजनही महत्त्वाचे आहे. विराट कोहली सराव सामन्यात वेगवेगळे टीम कॉम्बिनेशन वापरु शकतो.

Loading...

खराब फॉर्म असलेल्या खेळाडूंना होणार फायदा

आयपीएलमुळं भारतीय संघातील खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आबहेत. मात्र रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि विजय शंकर यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं या सराव सामन्यात त्यांना फायदा होऊ शकतो.

नंबर 4चा तिढा सुटणार?

भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असला तरी, विराट कोहलीसमोर मोठी समस्या आहे ती म्हणजे, चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार. सराव सामन्यात केएल राहुलला, विजय शंकर, केदार जाधव यांच्या पैकी एकाला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. त्यामुळं या सामन्यातून भारताला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळू शकतो.

असा असेल भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्र सिंग धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव.

असा असेल न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ट्रेंट बोल्ट, कोलिन डि ग्रांडहोम, लोकी फर्गुसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लाथम (विकेटकीपर), कोलिन मुन्रो, जिम्मी नीशाम, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊदी आणि रॉस टेलर.

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर


VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...