World Cup : 20 हजार 645 धावा करणारे फलंदाज झाले केवळ 3 धावांवर बाद

World Cup : 20 हजार 645 धावा करणारे फलंदाज झाले केवळ 3 धावांवर बाद

सेमीफायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

  • Share this:

मॅंचेस्टर, 10 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. सेमीफायनलमध्ये जडेजा आणि धोनी वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. धोनी आणि जडेजा यांनी शतकी भागिदारी केली, मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भारताची आघाडीची फलंदाजी.

साखळी सामन्यात केवळ इंग्लंडनं भारताला पराभूत केले होते. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये चांगली फलंदाजी करता आली नाही. सामन्याचा पहिला दिवस पावासामुळं वाया गेल्यानंतर आज न्यूझीलंडनं भारताला 240 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 221 धावांवर बाद झाला.

240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. जर या तीन खेळाडूंच्या वर्ल्ड कपमधील खेळीवर नजर टाकल्यास त्यांनी एकूण 1 हजार 452 धावा केल्या आहेत. यात एकट्या रोहित शर्माने तब्बल 5 शतके केली आहेत. याशिवाय त्यांनी एकदिवसीय कारकिर्दीत मिळून 20 हजार 645 धावा केल्या आहेत. मात्र अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात तिघेही तीन धावा करून बाद झाले.

भारताचे तुफान फॉर्ममधले वाघ न्यूझीलंडविरुद्ध तीन धावाच करू शकले. त्यामुळं न्यूझीलंडविरोधात भारताची अवस्था बिकट झाली. भारताचे पहिले चार फलंदाज फक्त 24 धावात बाद झाले. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम केले. मात्र, न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर गुडघे टेकले.

रोहितकडून होत्या अपेक्षा

वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावा केलेल्या रोहित शर्माला सेमीफायनलमध्ये एकच धाव काढता आली. रोहित शर्मा नेहमीच त्याच्या खेळीत सुरुवातील बेसावध फटके मारतो. यात तो बाद झाला नाही तर तो पुढे चांगला खेळ करतो. न्यूझीलंडविरुद्ध त्याची हीच गोष्ट भारताला महागात पडली.

कर्णधाराचे एकही शतक नाही

एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये सलग पाच अर्धशतकं केली. मात्र या सामन्यात विराट केवळ 1 धावावर बाद झाला. एवढेच नाही तर विराटला आतापर्यंत नॉक आऊट सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. गेल्या 5 नॉकआऊट सामन्यात विराटनं केवळ 72 धावा केल्या आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराटनं केवळ 443 धावा केल्या.

केएल राहुलचा बेजबाबदार शॉट

या वर्ल्ड कपमध्ये राहुलनं 361 धावा केल्या आहेत. मात्र आजच्या महत्त्वाच्या सामन्यात राहुल केवळ 1 धावा करत बाद झाला. श्रीलंकविरोधात राहुलनं शतकी खेळी केली होती. मात्र या सामन्यात त्याची बॅच चालली नाही.

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

First published: July 10, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या