Load More
मॅंचेस्टर, 09 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारत आणि न्युझीलंडमध्ये लढत सुरू आहे. मंगळवारी पावसामुळं सामना थांबला होता. परंतु, उर्वरीत सामना हा उद्या बुधवारी दुपारी ३ वाजता खेळवण्यात येणार आहे.उर्वरीत सामना हा उद्या खेळवण्यात येणार आहे. दरम्यान न्यूझीलंडनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन ओव्हर निर्धाव टाकल्यानंतर बुमराहनं गुप्टिलला बाद केले. त्यानंतर रवींद्र जडेजानं निकोलसला 28 धावांवर बाद केले. चहलनं कर्णधार विल्यम्सनला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. न्यूझीलंडची केविलवाणी अवस्था भारतीय गोलंदाजांनी केली आहे. हार्दिक पांड्यानं मोक्याच्या क्षणी निशामला 12 धावांवर बाद केले. 44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडन 200चा आकडा पार केला. तर, डी ग्रॅण्डहोम 16 धावांवर बाद झाला. दरम्यान पावसाचा जोर वाढला आणि आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना सुरू होणार आहे. आयसीसीकडून सेमीफायनल सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळं सामना दुसऱ्या दिवशी 46.1 ओव्हरपासून सुरु होईल. असाच प्रकार 1999मध्ये आणि 2002च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये घडला होता.