IND vs NZ : ICCने पुन्हा केली चूक, सेमीफायनलमध्ये चाहत्यांना बसणार फटका!

ब्रिटनच्या हवामान खात्यानुसार सेमीफायनलच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजता 50 टक्के पावसाची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 11:54 AM IST

IND vs NZ : ICCने पुन्हा केली चूक, सेमीफायनलमध्ये चाहत्यांना बसणार फटका!

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये मंगळवारपासून सेमीफायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. यातील पहिला सामना मंगळवारी भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या साम्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या सामन्यात जो संघ बाजी मारणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

याआधी भारत-न्यूझीलंड यांच्यातील झालेला सामना पावसामुळं रद्द झाला होता. दरम्यान आता सेमीफायनलमध्ये भारत-न्यूझीलंड यांच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. ब्रिटनच्या हवमान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिवसभर पावसाचे सावट असणार आहे. दरम्यान मंगळवारी पावासामुळं सामना रद्द झाल्यास आयसीसीकडून आणखी एका अतिरिक्त दिवसाची तरतूद करण्यात आली आहे.

रिझर्व्ह डेवरही पावसाचे सावट

याआधी साखळी सामन्यातील तब्बल चार सामने पावसामुळं रद्द झाले होते. त्यामुळं सेमीफायनलमध्ये राखीव दिवस ठेवण्यात आला. भारत-न्यूझीलंड यांचा सामना मंगळवारी पावसामुळं रद्द झाल्यास राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र बुधवारी राखीव दिवसावरही पावसाचे सावट आहे. ण इंग्लंडमधील हवामानाच्या अंदाजानुसार या दोन्ही दिवशी ज्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार तिथं ढगाळ वातावरण राहणार असून सामन्यावर पावसाचं सावट आहे.

भारत पोहचणार थेट फायनलमध्ये

Loading...

पावसामुळं जर सेमीफायनलचा सामना रद्द झाल्यास, अशा स्थितीत जर सेमीफायनलचा सामना रद्द झाल्यास पुढे काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला असेल. पण सामना रद्द होणं भारताच्याच पथ्यावर पडणार आहे. कारण गुणतालिकेत न्यूझीलंडचे 11 गुण असून भारताचे सर्वाधिक 15 गुण आहेत. त्यामुळे भारताला फायदा होणार असून सेमीफायनल रद्द झाल्यास थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे.

पावसाची शक्यता 50 टक्के

ब्रिटनच्या हवामान खात्यानुसार सेमीफायनलच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजता 50 टक्के पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दुपारी 1 वाजेपर्यंत पडण्याची शक्यता आहे.

सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास डकवर्थ लुईस होणार लागू

जर, सामना सुरु असताना पाऊस सुरु झाल्यास डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 50 षटकांपेक्षा कमी होईल. तसेच धावसंख्येचाही फटका दोन्ही संघांना बसू शकतो.

वाचा- WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक देणार

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

वाचा- World Cup मध्ये ICC परंपरा मोडून लॉर्डसवर रचणार इतिहास?

VIDEO : 'माझ्या मुलाला वाचवा', नारायण राणेंनी माझ्याकडे विनंती केली; पण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...