World Cup : धोनीचे वर्ल्ड कप 2019 जिंकण्याचे स्वप्न भंगले, आता घेणार निवृत्ती?

ICC Cricket World Cup : धोनी अर्धशतकी खेळीकरून धावबाद झाला तर, जडेजानं 77 धावांची आक्रमक खेळी केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 08:27 PM IST

World Cup : धोनीचे वर्ल्ड कप 2019 जिंकण्याचे स्वप्न भंगले, आता घेणार निवृत्ती?

मॅंचेस्टर, 10 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. जडेजा आणि धोनी वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. या सामन्यात धोनी आणि जडेजा यांनी शतकी भागिदारी केली, मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. धोनी अर्धशतकी खेळीकरून धावबाद झाला तर, जडेजानं 77 धावांची आक्रमक खेळी केली.

साखळी सामन्यात केवळ इंग्लंडनं भारताला पराभूत केले होते. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये चांगली फलंदाजी करता आली नाही. सामन्याचा पहिला दिवस पावासामुळं वाया गेल्यानंतर आज न्यूझीलंडनं भारताला 240 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 221 धावांवर बाद झाला. 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना चांगली फलंदाजी करता आली नाही.

न्यूझीलंड विरोधात धोनीला सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. यावरून नव्या वादाला तोंड फुटले, कारण दिनेश कार्तिक केवळ 6 धावांवर बाद झाला. त्यामुळं त्याचा जागी धोनीला फलंदाजी देण्याची गरज होती.

Loading...

धोनीचा शेवटचा वर्ल्ड कप

वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या धिम्या गोलंदाजीवर अनेकदा टिका करण्यात आली होती. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही धोनीच्या खेळीवर टिका केली होती. मात्र आजच्या सामन्यात धोनीनं अर्धशतकी खेळी करतच जडेजासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दरम्यान हा वर्ल्ड कप धोनीचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. वर्ल्ड कपनंतर धोनी कधीही आपली निवृत्ती जाहीर करेल.

वाचा- INDvsNZ : विल्यम्सनने 11 वर्षापूर्वीच्या पराभवाचा घेतला बदला!

वाचा- World Cup : 20 हजार 645 धावा करणारे फलंदाज झाले केवळ 3 धावांवर बाद

वाचा- World Cup जिंकण्याचं भारताचं स्वप्न 'या' कारणांनी भंगलं!

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...