IND vs NZ : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नॉटिंगहॅममध्ये पावसानं घेतली विश्रांती पण...

IND vs NZ : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नॉटिंगहॅममध्ये पावसानं घेतली विश्रांती पण...

  • Share this:

ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता विराटसेना विजयी हॅट्रीक साधण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्याला ग्रहण लागले होते, ते पावसाचे. त्यामुळं सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, आता बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र नाणेफेक उशीरानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतीय चाहते आणि विराटसेना सध्या देवाकडे साकडे घालत आहेत. त्यामुळं आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होत असला तरी पावसामुळं कोणता संघ नाणेफेक जिंकतो, याकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण पावासामुळं मैदानावर दव असू शकतो, त्यामुळं नाणेफेक महत्त्वाची भूमिका घेणार आहे.वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत तीनही सामने जिंकले आहेत, त्यामुळं गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भारताचा संघ दोन सामने जिंकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे आज वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा गेले दोन दिवस रंगत आहे आणि आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास पाऊसच हावी होईल, असे चित्र आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी, नाणेफेक उशीरानं होणार आहे.पावसाची खेळी महत्त्वाची

गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस होत आहे. पावसामुळं भारताला सरावही करता आला नाही. जर हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. मात्र चाहत्यांची पुरती निराशा होणार आहे.

...तर सामना 50 ओव्हरचा होणार नाही

सध्या पाऊस थांबला असला तरी, पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळं आता नाणेफेकही उशीरानं होणार आहे. दरम्यान पावसानं पुन्हा व्यत्यय आणला तर, सामना 50 ओव्हरचा होणार नाही. कमी षटकारांचा सामना खेळला जाऊ शकतो.

धवनची जागा घेणार राहुल

ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या सामन्यात धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं धवन तीन आठवडे वर्ल्ड कपमध्ये सामना खेळणार नाही आहे. त्यामुळं रोहित सोबत केएल राहुल सलामीसाठी येऊ शकतो. त्यामुळं चौथ्या क्रमांकावर कोण उतरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सराव सामन्यात किवी पडले होते भारतावर भारी

वर्ल्ड कप सामने सुरु होण्याआधी भारतानं न्यूझीलंविरोधात एक सामना खेळला होता. मात्र या सामन्यात न्यूझीलंडचा संघ भारतावर भारी पडला होता. भारताचा संपुर्ण संघ 179 धावांवर बाद झाला होता. हा सामना भारताला गमवावा लागला होता. त्यामुळं सराव सामन्याचा बदला भारताला आज घ्यावा लागणार आहे.


SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 02:16 PM IST

ताज्या बातम्या