IND Vs NZ : न्यूझीलंडचा 'हा' खेळाडू रोहित आणि विराटसाठी ठरणार धोकादायक

IND Vs NZ : न्यूझीलंडचा 'हा' खेळाडू रोहित आणि विराटसाठी ठरणार धोकादायक

भारत आणि न्यूझीलंड या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळं, दोन्ही संघ चिंतेत आहेत.

  • Share this:

लंडन, 13 जून : सध्या ICC World Cupमध्ये भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आधी दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर आता विराचसेना न्यूझीलंडला हरवण्यासाठी सज्ज आहे. मात्र, या सामन्यात भारताला ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान वर्ल्ड कपआधी झालेल्या सराव सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यात ट्रेंट बोल्टनं 4 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान यंदाच्या वर्ल्ड कपमध्येच गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीची चर्चा तर होत आहेच पण आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं सध्या सुरु असलेल्या World Cupमध्ये चिकनी कुकाबूरा नावाचा चेंडू वापरला जात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळंच चेंडू जास्त चांगला स्विंग होतो. याचा प्रत्यय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातही पाहायला मिळाला.

चिकनी कुकाबूरा या चेंडूमुळं गोलंदाजांना जास्त स्विंग मिळते. त्यामुळं फलंदाजांसाठी ही धोक्याची घंट असणार आहे, असेही म्हटले जात आहे. त्यातच वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यातही बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोन्ही गोलंदाजांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली. तर, दरम्यान आज न्यूझीलंडविरुद्धही हे दोन गोलंदाज भारतासाठी चांगली गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. मात्र, रोहित आणि विराटसाठी न्यूजीलंडचा एक गोलंदाज भारी पडणार आहे.

भारतीय खेळाडूंसाठी ट्रेंट बोल्ट धोकादायक

न्यूझीलंडच्या दौऱ्यात हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ केवळ 92 धावाच ऑलआऊट झाला होता. त्यावेळी अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या मैदानावर गोलंदाजांना विशेष फायदा गहोणार आहे. त्यामुळं ट्रेंट बोल्ट भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सराव सामन्यात बोल्टनं चार विकेट घेतल्या होत्या. त्यानं भारताला केवळ 179 धावांत बाद केले. त्यामुळं बोल्ट भारतासाठी धोकादायक ठरु शकतो.

भारताविरुद्ध बोल्टचे रेकॉर्ड चांगले

न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टचे भारताविरुद्ध रेकॉर्डस चांगले आहेत. त्यानं भारताविरोधात 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात 22 विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 150 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय गोलंददाजांच्या यादीत त्याच्या तीसरा क्रमांक लागतो.

धवनची दुखापत विराटसाठी ठरणार डोकेदुखी

ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तो तीन आठवडे कोणताही सामना खेळणार नाही आहे. त्यामुळं त्याची दुखापत विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहे. धवन ऐवजी सलामीला केएल राहुल येऊ शकतो, तर तिसऱ्या क्रमांकावर विजय शंकरला संधी मिळू शकते.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 13, 2019, 7:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading