हिटमॅन 25 धावांच्या आतच बाद होईल, बॉलिवूड अभिनेत्याची खेळाडूंबद्दल मुक्ताफळे!

हिटमॅन 25 धावांच्या आतच बाद होईल, बॉलिवूड अभिनेत्याची खेळाडूंबद्दल मुक्ताफळे!

ICC Cicket World Cup मध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये असून त्याला सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी 27 धावांची गरज आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत 647 धावा केल्या आहेत. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने आतापर्यंत 5 शतके केली आहेत. आता त्याच्याबद्दल बॉलीवूडचा अॅक्टर केएरकेनं वादग्रस्त ट्विट केलं आहे. त्यानंतर केआरके खानला ट्रोल केलं जात आहे. त्यानं रोहित शर्मा 25 धावांच्या आत बाद होईल असं म्हटलं आहे.

कमार राशिद खान म्हणजेच केएरकेनं वर्ल्ड कपबद्दल ट्विट करताना म्हटलं आहे की, न्यूझीलंडविरुद्ध भारत जिंकेल. तसेच फायनलला भारताचा सामना इंग्लंडशी होईल आणि तिथं मात्र पराभव पत्करावा लागेल.

कमाल राशिद खान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखी एक ट्विट केलं त्यात रोहित शर्माबद्दल वक्तव्य केलं आहे. तो म्हणला की, रोहित शर्मा फक्त 25 धावांच्या आतच बाद होईल. तर कर्णधार विराट कोहली अर्धशतकापेक्षा जास्त धावा करेल. रोहित शर्मा आणि भारताच्य़ा कामगिरीबद्दल केलेल्या ट्विटनंतर त्याला ट्रोल केलं जात आहे.

केआरकेनं याआधीही अनेकदा ट्विटमुळे वाद ओढवून घेतला आहे. ट्विटरने त्याचं अकाउंटही ब्लॉक केलं होतं. त्यानं बॅकअप अकाउंटवरून पुन्हा आपले ट्विट करायला सुरूवात केली.

भारत-न्यूझीलंड यांचा सामना पावसामुळं थांबला आहे. न्यूझीलंडचा सामना 46.1 ओव्हरमध्ये 211 धावांवर थांबला. त्यामुळं जर पाऊस काही वेळानं थांबला तर भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं जर, सामना 40 षटकांचा झाला तर भारताला 6च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.

वाचा- पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

वाचा- World Cup: हिटमॅन विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर; सचिनला टाकणार मागे?

वाचा- World Cup : न्यूझीलंडची अवस्था 11 वर्षापुर्वी होती तशीच, भारत जाणार फायनलमध्ये!

#NZvIND सामन्यात पहिल्याच चेंडूवर नेटकऱ्यांकडून ट्रोल, या आणि इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 08:50 PM IST

ताज्या बातम्या