Elec-widget

World Cup : काय चालयं काय, वर्ल्डकपसाठी निवड पण 'या' पुणेकराचे संघात स्थान निश्चित नाही

World Cup : काय चालयं काय, वर्ल्डकपसाठी निवड पण 'या' पुणेकराचे संघात स्थान निश्चित नाही

बांगलादेश विरोधात आज भारत शेवटचा सराव सामना खेळत आहे, त्यामुळं या सामन्यात होणारे प्रयोग भारतासाठी फायद्याचे ठरतील.

  • Share this:

लंडन, 28 मे : वर्ल्डकपसाठी केवळ 2 दिवस उरले असताना, विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाच्या अडचणी मात्र कायम आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खेळत असला तरी, फलंदाजी हा भारतासाठी  चिंतेचा विषय ठरला आहे. ते न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात दिसून आले. भारताला केवळ 179 धावा करता आल्या. त्यामुळं फलंदाजी भारताला विश्वचषकात तारेल का, हा प्रश्न विराट समोर आहे.

न्युझीलंड विरोधात भारताची फलंदाजी पुरती कोलमडली होती. मात्र यापेक्षाही मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची जागा फिक्स नसल्यानं मधल्या फळीली कोण तारणार हा प्रश्न कायम आहे. विजय शंकर आणि केदार जाधव हे दोन्ही भारताचे युवा फलंदाज चौथ्या क्रमांकाचे प्रबळ दावेदार असले तरी, न्युझीलंड विरोधात या दोघांनाही संघात स्थान मिळाले नाही. कारण दोन्ही फलंदाज दुखापतग्रस्त असल्यामुळं त्यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळं भारतीय संघ 179 धावांतच गारद झाला. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात तंदुरुस्त झालेल्या विजय शंकरला जागा देण्यात आली आहे. मात्र, केदार जाधवला संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळं केदार जाधवची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय ठरु शकते. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. मात्र न्युझीलंड विरोधात चांगली कामगिरी करता आली नाही.

सराव सामन्यात चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाचा मुद्दा सोडवण्याचे प्राथमिक ध्येय भारतीय संघाने ठेवले होते. मात्र केदार जाधव दुखापतीतून अद्याप न सावरल्यामुळे भारताच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. केदारच्या डाव्या हाताच्या खांद्याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. तसेच नेटमध्ये सराव करताना खलिल अहमदचा चेंडू विजयच्या हातावर आदळला होता. आता चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेश विरुद्धचा सराव सामना भारतासाठी शेवटचा सराव सामना असणार आहे. तर, भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे.

सलामीचे फलंदाज पुन्हा फेल

न्युझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात स्वींग गोलंदाजांसमोर फलंदाजांनी नांगी टाकली. यात सलामीचे फलंदाज सपशेल फेल ठरले. दरम्यान शेवटच्या सराव सामन्यातही धवन आणि रोहित शर्मा यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. शिखर धवन केवळ 1 धावांवर बाद झाला तर, रोहित शर्मा 19 धावा करत बाद झाला. दोघांमध्ये केवळ 5 धावांची भागीदारी झाली. त्यामुळं विराटच्या चिंता वाढणार आहेत.

Loading...


VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 04:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...