Elec-widget

IND vs BAN : भारताची फलंदाजी विराटसाठी डोकेदुखी, मुख्य सामन्यांआधी संघात होणार बदल ?

IND vs BAN : भारताची फलंदाजी विराटसाठी डोकेदुखी, मुख्य सामन्यांआधी संघात होणार बदल ?

बांगलादेश विरोधात आज भारत शेवटचा सराव सामना खेळत आहे, त्यामुळं या सामन्यात होणारे प्रयोग भारतासाठी फायद्याचे ठरतील.

  • Share this:

लंडन, 28 मे : विश्वचषकासाठी केवळ 2 दिवस उरले असताना, सराव सामन्यांमध्ये आपल्या कमकुवत बाजू सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाच्या चिंता मात्र काही केल्या दुर होताना दिसत नाही आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात दिसून आले. भारताला केवळ 179 धावा करता आल्या. त्यामुळं फलंदाजी भारताला विश्वचषकात तारेल का, हा प्रश्न विराट समोर आहे. दरम्यन या सामन्यात केएल राहुलचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा ठरु शकतो.

न्युझीलंड विरोधात भारताची फलंदाजी पुरती कोलमडली होती. बांगलादेश विरोधात असेही चित्र पाहायला मिळाले. भारताचा अर्धा संघ 102 धावांवर बाद झाला. त्यामुळं मधल्या फळीतील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची जागा फिक्स नसल्यानं मधल्या फळीली कोण तारणार हा प्रश्न कायम आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडू जवळजवळ गेले 2 महिने आयपीएल खेळले आहेत. त्याआधी आस्ट्रेलियाविरोधात 5 एकदिवसीय सामने, टी-20 मालिका आपल्या घरच्या मैदानावर खेळले आहेत. त्यामुळं तब्बल 2-3 महिन्यांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाचा भारताबाहेर खेळणार आहे. याचेच परिणाम पहिल्या सराव सामन्यात दिसले. तसेच दुसऱ्या सामन्यातही दिसून आले.

भारताच्या मधल्या फळीतील विजय शंकरला केवळ 2 धावा करता आल्या आणि रहिम रुबेलनं त्याला बाद केले. त्यामुळं विजय शंकर खरच मधल्या फळीसाठी दावेदार आहे का, हा प्रश्न आता उभा होत आहे. यातच भारताच्या सलामीच्या फलंदाजांचीही चिंता विराटला आहे. धवन आणि रोहित यांनी केवळ 5 धावांची भागीदारी केली. तर, विराट 47 धावांवर बाद झाला.

आयपीएलचा फिव्हर उतरेना

भारतीय संघातील खेळाडू गेले 2 महिने आयपीएल खेळत होता. त्याचा फटका खेळाडूंच्या खेळावर बसत असल्याचे चित्र गेल्या सराव सामन्यात आणि बांगलादेश विरोधातही दिसून आले. केएल राहुल, विजय शंकर यांच्यासारखे युवा फलंदाज प्रत्येक चेंडूवर आक्रमक खेळी करण्याच्या जोशात दिसून आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला सुरुवातीला संथ गतीने फलंदाजी करावी लागते, त्यांनतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आक्रमक फलंदाजी करावी लागते. मात्र हे युवा फलंदाज तसे करताना दिसत नाहीत.

Loading...

जलद गोलंदाजी भारताचा विक पॉईंट

न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भारताचे 4 फलंदाज बाद झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय फलंदाजांना न आलेला गोलंदाजीना अंदाज, त्यामुळेच भारतीय संघाला केवळ 179 धावात आपला गाशा गुंडाळावा लागला. तर, आजच्या सामन्यातही तसेच चित्र दिसले.

सलामीचे फलंदाज पुन्हा फेल

न्युझीलंड विरोधात झालेल्या सामन्यात स्वींग गोलंदाजांसमोर फलंदाजांनी नांगी टाकली. यात सलामीचे फलंदाज सपशेल फेल ठरले. दरम्यान शेवटच्या सराव सामन्यातही धवन आणि रोहित शर्मा यांना चांगली फलंदाजी करता आली नाही. शिखर धवन केवळ 1 धावांवर बाद झाला तर, रोहित शर्मा 19 धावा करत बाद झाला. दोघांमध्ये केवळ 5 धावांची भागीदारी झाली. त्यामुळं विराटच्या चिंता वाढणार आहेत.

चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम

सराव सामन्यात चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाचा मुद्दा सोडवण्याचे प्राथमिक ध्येय भारतीय संघाने ठेवले होते. मात्र केदार जाधव दुखापतीतून अद्याप न सावरल्यामुळे भारताच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. केदारच्या डाव्या हाताच्या खांद्याला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. तसेच नेटमध्ये सराव करताना खलिल अहमदचा चेंडू विजयच्या हातावर आदळला होता. आता चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात राहुलनं 47 चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं.


VIDEO: 30 सेकंद उडणारं 3 ग्रॅम वजनाचं विमान तुम्ही पाहिलं आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...