IND vs BAN : आज टीम इंडियात होणार दोन मोठे बदल, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

IND vs BAN : आज टीम इंडियात होणार दोन मोठे बदल, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भारताला बांगलादेशला नमवावे लागणार आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 02 जुलै: ICC cricket world cupमध्ये आज (2 जुलै) भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. एजबॅस्टन मैदाावर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारताल सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया दुसऱया स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात भारताला सावध राहणे गरजेचे आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अनके कमकूवत बाजू समोर आल्या आहेत. विशेषत: महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळं भारतीय संघात आज दोन मोठे बदल होऊ शकतात. Dream11च्या अंदाजानुसार केदार जाधव आणि युजवेंद्र चहल यांना इंग्लंड विरोधात चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं त्यांना बांगलादेश विरोधात होणाऱ्या सामन्यात विश्रांती देऊ शकतात. त्यामुळं भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा यांना संघात संधी मिळू शकते.

भारताचे सध्या आहेत 11 गुण

भारतानं आतापर्यंत 7 सामना खेळले आहेत. यातील पाच सामना भारताने जिंकले आहेत. तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला आणि एका सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. इंग्लंड विरोधात सामना गमावल्यानंतर सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकावा लागणार आहे.

जडेजाला संघात मिळू शकते संधी

रविंद्र जडेजा यानं आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं आजच्या सामन्यात केदार जाधवच्या जागी जडेजाला संधी मिळू शकते. केदार जाधवला गेल्या पाच सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं आव्हानाचा पाठलाग करताना भारताला जडेजाची गरज लागेल.

भुवनेश्वरही करू शकतो कमबॅक

पाकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार जखमी झाला होता. मात्र आता भुवीनं कमबॅक केले आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात त्याला संधी मिळू शकते. इंग्लंड विरोधात भारतीय फिरकीपटूंना फलंदाजांनी टार्गेट केले होते. चहलनं 10 ओव्हरमध्ये 88 धावा दिल्या होत्या. त्यामुळं आजच्या सामन्यात जलद गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते

असे असतील संघ

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव/रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार/युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

बांगलादेश: तमीम इकबाल, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, सौम्य सरकार, महदुल्लाह, मोसदेक हुसैन, मो. सैफुद्दीन, मेंहदी हसन, मशरफे मुर्तजा, मुस्तफिजुर रहमान.

वाचा- #MumbaiRainlive : पाऊस मुंबईकरांच्या जीवावर उठला, मुलुंडमध्येही भिंत कोसळली

वाचा- World Cup: विराटसेना जपून खेळा; होऊ शकते 2007ची पुनरावृत्ती!

वाचा- World Cup: बांगलादेशविरुद्ध भारताची नजर सेमीफायनलवर; विराटसेनेला 'हा' आहे धोका!

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या