IND vs NZ : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर भारतानं टॉस जिंकून घ्यावी फलंदाजी, 'हे' आहे कारण

IND vs NZ : वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर भारतानं टॉस जिंकून घ्यावी फलंदाजी, 'हे' आहे कारण

मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना होणार आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 08 जुलै : ICC Cricket World Cupच्या स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. दरम्यान न्यूझीलंड विरोधात भारताला सामना जिंकायचे असेल तर त्यांना टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घ्यावा लागेल.

भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याविरोधात आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. तर, इंग्लंड विरोधात आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पराभव स्विकारावा लागला होता. दरम्यान साखळी सामन्यातील 45 सामन्यांत केवळ 14 वेळा आव्हानाचा पाठलाग करताना संघांनी विजय मिळवला आहे. तर 4 सामने पावसामुळं रद्द झाले. दरम्यान 2007, 2011, 2015 वर्ल्ड कपमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना आणि प्रथम फलंदाजी करताना सामन्याची जिंकण्याची सरासरी समान होती. 2007मध्ये 25-25 असा आकडा होता. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 27 सामने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.

आव्हानाचा पाठलाग करणे कठिण

वर्ल्ड कप 2019मध्ये पहिल्या तीन आठवड्यात झालेल्या 21 सामन्यात 11 संघानी पहिल्यांदा फलंदाजी करताना सामना जिंकला. तर, साखळी सामन्यातील शेवटच्या काही सामन्यात 16 संघ प्रथम फलंदाजी करताना सामने जिंकले आहेत.

सेमीफायनलमध्ये टॉस महत्त्वाचा

वर्ल्ड कप 2019मध्ये आता केवळ 3 सामने बाकी आहेत. हे सामने ओल्ड ट्रेफर्ड आणि एजबेस्टन या मैदानांवर होणार आहेत. तर, फायनल लॉर्ड्सच्या मैदानावर होईल. यातील भारताचा सामना ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर होणार आहे. दरम्यान यातील केवळ एजबेस्टनच्या मैदानावरच केवळ आव्हानाचा पाठलाग करताना संघ सामना जिंकला आहे. ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर पाच सामने खेळले गेले आहेत. यातील सर्व सामने पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानी जिंकले आहेत.

वाचा- यॉर्कर किंग बुमराहनं सांगितला भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा फॉर्म्युला

वाचा- इंग्लंड असो की ऑस्ट्रेलिया World Cup भारतच जिंकणार, 'हा' घ्या ठोस पुरावा!

वाचा- World Cup: टीम इंडियाकडे शेवटची संधी; 44 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेणार!

VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या