World Cup मध्ये भारताच्या पराभवानंतर नवीन 'मौका-मौका', VIDEO VIRAL

World Cup मध्ये भारताच्या पराभवानंतर नवीन 'मौका-मौका', VIDEO VIRAL

भारत आणि पाक यांच्यात वर्ल्ड कपच्या आधीपासून जाहीरात युद्ध सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला. मात्र, तरीही संघाचे चाहते स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचं कौतुक करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. यामुळं भारताचं तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. आता स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा 'मौका मौका' जाहीरात तयार करण्यात आली आहे. यात चाहत्यांनी भारताच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

नव्या जाहीरातीत एक भारतीय चाहता आणि एक पाकिस्तानी चाहता सेमीफायनलनंतर भेटतात असं दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी चाहता भारताची टिंगल उडवतो. त्यावर भारताचा चाहता आपल्या संघाचं कौतुक करत त्याला जबरदस्त उत्तर देतो.

भारतीय चाहता म्हणतो की, आम्ही पूर्ण स्पर्धेत विजेत्यासारखं खेळलो. आम्ही दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहिलो नाही. आम्ही सर्व प्रतिस्पर्ध्यांना विचार करायला भाग पाडलं असंही तो चाहता म्हणतो.

आमचा दिवस खराब होता नाही तर आमचा 7 नंबरनेच तुम्हाला रडवलं असतं. जिंकल्यावर संघाचं कौतुक आणि हारल्यावर टीका सगळेच करतात पण आम्हा भारतीयांची पद्धत वेगळी आहे. आम्ही विजय मिळवण्याआधी विरोधी पक्षांच्या कमकुवत बाजू समोर आणतो आणि त्यानंतर इंडिया, इंडिया असा जल्लोष करतो.

वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वी तसंच भारत-पाक सामन्याआधीही जाहीरात युद्ध झालं होतं. तेव्हा दोन्हीकडून एकमेकांवर टीका करणयात येत होती. भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर पाकचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचे समान गुण झाले. मात्र, धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडने बाजी मारली.

किती चांद्रमोहिमा झाल्या यशस्वी? पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या