World Cup : इंग्लंडचा भारताला डबल धक्का, हिरावून घेतलं पहिलं स्थान!

World Cup : इंग्लंडचा भारताला डबल धक्का, हिरावून घेतलं पहिलं स्थान!

ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताचा आतापर्यंत फक्त इंग्लंडविरुद्ध पराभव झाला आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये इंग्लंडने भारताचा विजयरथ रोखला. भारतावर विजयासह इंग्लंडनं आयीसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं आहे. एक आठवड्याआधी भारताने पहिलं स्थान पटकावलं होतं. आता भारत पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याची माहिती आयसीसीने ट्विटरवरून दिली आहे.

इंग्लंड 123 गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहचला आहे. तर भारताचे 122 गुण आहेत. इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्याआधी भारताचे 123 गुण होते. इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताचे गुण कमी होऊन इंग्लंड पुन्हा अव्वल झाले.

इंग्लंडने मार्च 2018 मध्ये एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत नंबर वनचं स्थान पटकावलं होतं. तेव्हाही इंग्लंडने भारताला मागे टाकलं होतं. सध्या न्यूझीलंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. दोन्हींचे 113 गुण असून धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडनं बाजी मारली. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिका पाचव्या, पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानी बांगलादेश तर आठव्या स्थानावर लंका असून वेस्ट इंडिज नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारताने 7 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. भारताला फक्त इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला होता. भारत बांगलादेश आणि लंकेवर विजय मिळवून पुन्हा नंबर वनवर पोहचू शकते.

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

First published: July 2, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading