World Cup : भाजपच्या दबावामुळे या खेळाडूला वगळले, पाकच्या क्रिकेटतज्ज्ञाचा खळबळजनक आरोप

ICC Cricket World Cup : भारताचा वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 10:01 PM IST

World Cup : भाजपच्या दबावामुळे या खेळाडूला वगळले, पाकच्या क्रिकेटतज्ज्ञाचा खळबळजनक आरोप

नवी दिल्ली, 07 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. अखेरच्या सामन्यात बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यानं पाकचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर पाकमध्ये एका टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाने खळबळजनक आरोप केला आहे. पाकचा संघ मायदेशी परतला असून आता तिथले तथाकथित क्रिकेट जाणकार मुक्ताफळं उधळू लागले आहेत. इंग्लंडविरुद्ध भारत मुद्दाम पराभूत झाला म्हणणाऱ्यांनी आता नवीनच आरोप करायला सुरूवात केली आहे.

भारताने लंकेविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्याऐवजी संघात रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली होती. यामध्ये लंकेविरुद्ध मोहम्मद शमीला जाणीवपूर्वक वगळल्याचं पाकिस्तानी क्रिकेट जाणकाराने म्हटलं आहे. शमी चांगली कामगिरी करत होता. त्याने 15 विकेट घेल्यावरही फक्त मुस्लीम आहे म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमधुन बाहेर केलं. यामागे भाजपचा हात असू शकतो असा आरोप त्या क्रिकेट जाणकाराने केला आहे.

भारताने अखेरच्या साखळी सामन्यात लंकेवर दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेनं दिलेलं 265 धावांचं आव्हान 39 चेंडू आणि 7 गडी राखून भारताने पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी शतके केली. तर बुमराहने तीन आणि पांड्या, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Loading...

World Cup : पाकला बाहेर काढण्यासाठी भारत हरला का? सर्फराजनं दिलं उत्तर

वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील सामने संपले आहेत. सेमीफायनलला कोणत्या संघात लढती होणार हे निश्चित झाले आहेत. पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. 9 जुलैला पहिला सामना मँचेस्टरवर तर 11 जुलैला दुसरा सामना बर्मिंगहमवर होणार असून अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला 'हा' क्रिकेटर धोकादायक!

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...