World Cup : पराभव जिव्हारी, विराट आणि रोहित यांच्यात दुरावा?

ICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये विराट, रोहित आणि केएल राहुल यांना फक्त एक धाव करता आली.

  • Share this:

ICC Cricket World Cup 2019 च्या सेमीफायनलमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं. भारताने पहिल्या काही षटकांतच आघाडीचे फलंदाज गमावले. या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोहलीला फक्त एकच धाव काढता आली तर सलामीवीर रोहित शर्माला सुद्धा एका धावेवर तंबूत परतावं लागलं. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण निराशाजनक असंच होतं. सामना संपल्यानंतरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ते पाहता कोहली आणि रोहित यांच्यातलं बोलणं बंद झाल्याची चर्चा सुरू आहे.

2019 वर्ल्ड कपपर्यंत भारताचे फिजिओ असलेल्या पॅट्रिक फरहार्ट यांना सामन्यानंतर विराट भेटला. त्यानंतर प्रत्येक खेळाडू एकमेकाला सावरत होते. तर रोहित शर्मा एका बाजूला उभा होता.

फिजिओंना भेटल्यानंतर कोहली भुवनेश्वरला भेटला आणि सर्वांना भेटत तो प्रेझेंटेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित झाला.

दरम्यान, कोहलीने सर्वांची भेट घेतली मात्र, रोहितच्या जवळ येताच विराट त्याच्या पाठीमागून निघून गेला. रोहित त्याच्या जागेवर तसाच उभा होता.

भारताचा पराभव होताना सर्वात जास्त रोहित शर्मा टेन्शनमध्ये दिसत होता. साखळी फेरीत 5 शतकं केलेल्या रोहितला सेमीफायनलमध्ये मात्र एकच धावा काढता आली . धोनीला खालच्या क्रमांकावर पाठवल्यानं कोहलीवर टीकाही केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या