INDvsNZ : मैदानावर दिसले पंतप्रधान मोदी, पाहा सामन्यातील खास क्षण!

ICC Cricket World Cup : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे थांबला असून पाऊस सुरूच राहिला तर सामना बुधवारी होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

पावसामुळे डाव थांबला असून पाऊस सुरुच राहिला तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्यात येऊ शकतो.

न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवलं. बुमराह आणि भुवनेश्वर कुमारनं टिच्चून मारा केला.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिलं यश मिळवून दिलं. त्याने मार्टिन गुप्टिलला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडलं.

भारताला जडेजानं दुसरं यश मिळवून दिलं त्यानं हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवला.

न्यूझीलंडचा चौथा गडी 162 धावांवर बाद झाला. जेम्स निशामचा हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने झेल घेतला.

पांड्याला 16 व्या षटकानंतर दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर पुन्हा मैदानात उतरल्यावर पांड्यानं जेम्स निशामला बाद केलं.

न्यूझीलंडची सर्व भीस्त त्यांचा कर्णधार केन विल्यम्सनवर होती. त्याला 67 धावाच करता आल्या.

केन विल्यम्सनला युझवेंद्र चहलने बाद केलं. चहलने 10 षटकांत 63 धावा दिल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला 95 चेंडूत 67 धावाच करता आल्या. यात त्याने 6 चौकार मारले. चहलच्या गोलंदाजीवर जडेजाने त्याचा झेल घेतला.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 45 व्या षटकात कोलिन डी ग्रॅण्डहोमला बाद करून न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला.

मँचेस्टरचे मैदान भारतीय चाहत्यांच्या गर्दीने फुलून गेले होते.

ओल्ड ट्रॅफर्डवर भारतीय चाहत्यांचा जल्लोष ओसंडून वाहत होता. यात लक्ष वेधून घेतलं ते भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या चेहऱ्य़ाचे पोस्टर हातात घेतलेल्या चाहत्यांनी.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील सामनाही पावसाने वाया गेला होता. त्यांना प्रत्येकी एक गुण विभागून देण्यात आला होता.

भारत आणि न्यूझीलंड याआधी 11 वर्षापूर्वी अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलला आमने सामने आले होते. त्यावेळी सध्याचे दोन्ही संघाचे कर्णधारच त्यावेळी आपआपल्या देशाचं नेतृत्व करीत होते.

भारताने आतापर्यंत फक्त इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला आहे. उर्वरित सामने भारताने जिंकले असून फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडचे आव्हान असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 08:21 PM IST

ताज्या बातम्या