INDvsENG : विराट कोहलीला मोईन अलीचं ओपन चॅलेंज!

ICC Cricket World Cup विराटला अंडर 19 मध्ये खेळत असल्यापासून ओळखतो म्हणत मोईन अलीने चॅलेंज दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 12:08 PM IST

INDvsENG : विराट कोहलीला मोईन अलीचं ओपन चॅलेंज!

बर्मिंगहम, 29 जून : ICC Cricket World Cup मध्ये रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. भारताला सेमीफायनलचं स्थान पक्क करण्यासाठी तर इंग्लंडला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय गरजेचा आहे. दरम्यान सामन्यापूर्वी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करेन असं सांगितलं आहे.

मोईन अवी म्हणाला की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. विराट कोहलीला माहिती आहे की त्याला धावा करायच्या आहेत. तर मी इकडे त्याला बाद करण्याच्या तयारीत आहे. विराटला बाद करूनही आपण त्याचा मित्र म्हणून कायम राहता येतं. विराटला मी अंडर 19 मध्ये खेळत असल्यापासून ओळखतो असंही मोईन अलीने सांगितलं. मोईन अली 2018 आणि 2019 मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.

एकदिवसीय आणि टी20 मोईन अलीने विराट कोहलीला आतापर्यंत 7 वेळा बाद केलं आहे. मोईनने आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विंडीजच्या ब्रेथवेटला 8 वेळा बाद केलं आहे. मोईनने भारतीय फलंदाजांना कसोटीत जास्त वेळा बाद केलं आहे. त्याने कसोटीत भारताविरुद्ध 41 विकेट घेतल्या आहेत.

पाहा 'मेन इन ब्ल्यू' कसे दिसतात भगव्या रंगात, PHOTO VIRAL

वर्ल्ड कपमध्ये विराटचे रनमशिन धावांचा पाऊस पाडत आहे. विराटने आतापर्यंत चार अर्धशतकांसह 316 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राइकरेट 98.44 असा आहे.

Loading...

इंग्लंडच्या मोईन अलीला आतापर्यंत फारशी चमक दाखवता आलेली नाही. गोलंदाजीत त्याने फक्त 5 बळी घेतले असून फलंदाजी करताना 75 धावा केल्या आहेत.

World Cup Point Table : लंकेच्या पराभवाने तीन संघांमध्ये चुरस!

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...