विराटला चॅलेंज देणाऱ्याला ठेवलं बाहेर, तोच ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट!

विराटला चॅलेंज देणाऱ्याला ठेवलं बाहेर, तोच ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट!

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडने मोईन अलीला विश्रांती देऊन मोठी खेळी करत भारतावर विजय मिळवला.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 01 जून : इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवून वर्ल्ड कपमधील आपले आव्हान जिवंत ठेवलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेअरस्टोचं शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉय यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 337 धावांचं आव्हान भारताला दिलं. सलामीवीरांनी केलेल्या 160 धावांच्या भक्कम भागिदारीनंतर भारताने कमबॅक केलं.इंग्लंडने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 5 बाद 306 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि कोहलीच्या अर्धशतकानंरही भारताचा डाव गडगडला.

भारताचा विजय शंकर दुखापतीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली होती. तर इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात जेम्स विन्सच्या जागी जेसन रॉयला तर मोईन अलीच्या जागी लियाम प्लंकेटला घेतलं. या दोघांनीही संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

सामन्याआधी मोईन अलीनं विराट कोहलीला आपण बाद करणार असा इशारा दिला होता. मोईन अली म्हणाला होता की, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. विराट कोहलीला माहिती आहे की त्याला धावा करायच्या आहेत. तर मी इकडे त्याला बाद करण्याच्या तयारीत आहे. विराटला बाद करूनही आपण त्याचा मित्र म्हणून कायम राहता येतं. विराटला मी अंडर 19 मध्ये खेळत असल्यापासून ओळखतो असंही मोईन अलीने सांगितलं होतं. मोईन अली 2018 आणि 2019 मध्ये आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे.

मोईनच्या जागी लियामला घेतलं

World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

मोईन अलीनं चॅलेंज दिलं पण त्यालाच संघाबाहेर बसावं लागलं. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला साथ देणारी असल्यानं इंग्लंडनं त्याच्या जागी लियाम प्लंकेटला घेतलं. त्याने तिन विकेट घेत भारताच्या फलंदाजीतली हवा काढून घेतली.

गोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.

भारताचा सलामीवीर केएल राहुल शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराटने 138 धावांची भागिदारी केली. ख्रिस वोक्सनं ही जोडी फो़डून भारताला दुसरा दणका दिला. कोहली 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा शतक झाल्यावर लगेच बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत आणि पांड्या ठराविक अंतराने बाद झाले. पंतने 32 तर पांड्याने 45 धावा केल्या. धोनी 42 आणि केदार जाधव 12 धावांवर नाबाद राहिले.

'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

तत्पूर्वी, जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी इंग्लंडला भक्कम सुरूवात करून दिली. दोघांनी 22 षटकांत 160 धावांची भागिदारी केली. त्यानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. जोस बटलरने 8 चेंडूत 20 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.

World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

First published: July 1, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading