World Cup : मांजरेकरांवर भडकले चाहते, कमेंट्री बंद करण्याची मागणी!

World Cup : मांजरेकरांवर भडकले चाहते, कमेंट्री बंद करण्याची मागणी!

ICC Cricket World Cup 'मांजरेकर समालोचन करायला लागले की चाहते टीव्ही म्यूट करत आहेत'

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : ICC Cricket World Cup भारत आणि बांगलादेश यांच्या सामन्यावेळी सोशल मिडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना ट्रोल करण्यात येत आहे. चाहत्यांनी मांजरेकर यांना समालोचक म्हणून काढून टाकावं अशी मागणी केली आहे. भारतात ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये संजय मांजरेकर यांचं नाव आलं आहे. यात मांजरेकर यांना ट्रोल करणारे ट्विट करण्यात आली आहेत. सोशल मिडियावर लोकांनी मांजरेकरांच्या समालोचनावेळी म्यूट टीव्हीचे फोटो शेअर केले आहेत. समालोचकाला हटवण्यासाठी काय करावं लागतं असा प्रश्न विचारण्यात आलं आहे. मांजरेकर यांनी धोनीबद्दल केलेल्या कमेंटवरून सर्वाधिक चर्चा होत आहे.

संजय मांजरेकर यांच्याविरुद्ध एका चाहत्यानं आयसीसीकडं तक्रार केली होती. यामध्ये मांजरेकर यांच्यावर एखाद्यावर मुद्दाम टीका करतात तर एखाद्याची बाजू घेतात असा आरोप केला होता. याबद्दल आयसीसीच्या मुख्यालयाला पत्रही पाठवलं होतं.

चाहत्यानं पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून माझा नमस्कार. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये समालोचक असलेल्या मांजरेकरांबद्दल सांगायचं आहे. ते समालोचन करताना पक्षपात करत असल्याचं दिसतं. तसेच आत्मस्तुती आणि स्वत:बद्दल जास्त बोलत असतात. याशिवाय चांगल्या स्पर्धेची आशा आहे. धन्यवाद'

क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनीही ट्विटमध्ये मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला आहेत. ते म्हणतात की, धोनी बाद झाल्यावर प्रतिस्पर्धी संघापेक्षा संजय मांजरेकर यांनाच जास्त आनंद होताना दिसतो.

एका ट्विटमध्ये चाहत्याने असं म्हटलं आहे की, संजय मांजरेकर इतके वाईट समालोचक आहेत की चाहते टीव्ही म्यूट करून बघत आहेत. मांजरेकर पुन्हा आले तर पुन्हा टीव्ही म्यूट होईल.

World Cup : केदार जाधवच्या जागी जडेजाला संघात घ्यावं, सचिनचा सल्ला

रोहित शर्मा म्हणाला, फक्त धोनीचं काम नाही तर इतरांचीसुद्धा जबाबदारी

World Cup : शंकरची दुखापत संशयाच्या भोवऱ्यात, BCCIनं दिलं कामगिरीचे फळ?

World Cup : शंकर आऊट मयंक इन! रहाणेनं निवृत्ती घेतली का?

SPECIAL REPORT : भगव्या जर्सीमुळे टीम इंडियाचा पराभव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या