WORLD CUP : 'भारतच जिंकणार वर्ल्ड कप', प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा दावा

WORLD CUP : 'भारतच जिंकणार वर्ल्ड कप', प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूचा दावा

अनेक दिग्गज क्रिकेटर तसेच विश्लेषक विजेत्या संघाबद्दल अंदाज व्यक्त करत आहेत.

  • Share this:

लंडन, 21 जून : जगभरातील क्रिकेट रसिकांना ICC Cricket World Cup कोण जिंकणार याची उत्सुकता लागली. अनेक दिग्गज क्रिकेटर तसेच विश्लेषक विजेत्या संघाबद्दल अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच आता अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर आणि वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर असलेल्या राशिद खानने विजेत्या संघाबद्दल भाष्य केलं आहे.

'भारतीय संघ वर्ल्डमधील सर्वाधिक ताकदवान संघ आहे. फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही टीम इंडियाकडून दमदार कामगिरी करण्यात येत आहे. त्यामुळे भारतच वर्ल्ड कप जिंकेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही,' असं राशिद खान याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये भारताचा संघ आज अफगाणिस्तानशी भिडणार आहे. हा सामना साऊदम्पटन मैदानावर होत आहे. याच मैदानात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारतीय चाहते चिंतेत आहेत. असं असलं तरी हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवलेली नाही.

सेहवागची फेव्हरेट टीम कोणती?

वर्ल्ड कपमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या विजयीपथावर आहे. भारतानं आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, यातील तीन सामन्यात विजय तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. वर्ल्ड कपमध्ये सेहवागनं इंग्लंड हा आपला आवडता संघ असल्याचे जाहीर केले आहे. याचे कारण म्हणजे, "इंग्लंडकडे 1-2 नाही तर तब्बल 11 फलंदाज आहे. सात गोलंदाज आहेत. त्यामुळं त्यांचा संघ फक्त कागदावर नाही तर, मैदानावरही शेर आहे. त्यामुळं जर, भारताला त्यांच्या विरोधात जिंकायचे असेल तर, त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे". "भारत-इंग्लंड यांच्यात चांगले आहे, हे सेमीफायनलमध्ये कळेल", असेही सेहवाग म्हणाला.

VIDEO : पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading