1983 World Cup : कपिल देव नाही तर 'हे' होते 1983च्या वर्ल्ड कपचे खरे हिरो

1983 World Cup : कपिल देव नाही तर 'हे' होते 1983च्या वर्ल्ड कपचे खरे हिरो

प्रत्येक भारतीयाच्या मनात विश्वचषकाच्या आठवणी पेरण्यास सुरुवात केली ती कपिल देव यांच्या 1983च्या संघानं.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं त्यांच्याकडे विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. मात्र आज 25 जून, याच दिवशी तब्बल 36 वर्षांपूर्वी भारतानं पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला ते ही दोन वेळा चॅम्पियन असणाऱ्या वेस्ट इंडिजला नमवत. कोट्यावधी भारतीयांसाठी तो सुवर्ण दिवस होता. कोणी विचारही नव्हता केला असा इतिहास 25 जून 1983 साली घडला. त्याचे शिल्पकार होते, भारताचे तेव्हाचे कर्णधार कपिल देव आणि त्यांचे साथीदार. त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात विश्वचषकाच्या आठवणी पेरण्यास सुरुवात केली. अगदी विराट कोहलीप्रमाणे कपिल देव सुध्दा कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा होत्या.

1983च्या भारतीय संघात कोणताही तज्ञ फलंदाज नव्हता कि गोलंदाज. तरी, त्या 15 खेळाडूंच्या संघात इतिहास लिहण्याची धमक होती. या संघाकडून अपेक्षा असल्या तरी आता विराटच्या संघावर असतील तेवढ्या नक्कीच नव्हत्या, त्यामुळं तसा कपिल देव यांच्या संघ निर्धास्त होता. पण या संघात एक असा खेळाडू होता ज्यानं भारताला विश्वचषकाच्या जवळ नेले. तो खेळाडू होता, मोहिंदर जिमी अमरनाथ. जिमी एक उत्तम फलंदाज होते, पण संघाच्या गरजेनुसार ते गोलंदाजीही करत त्यामुळं ते एक उत्तम अष्टपैलु खेळाडू झाले होते. भारतीय संघ दोन वेळा चॅम्पियन बनलेल्या वेस्ट इंडिज संघाला आणि ऑस्ट्रेलियाला एकदा तर, झिंम्बावेला दोन वेळा हरवून सेमीफायनपर्यंत आला होता. मात्र इंग्लंडमध्ये सेमीफायनलमध्ये कमाल केली ती अमरनाथ यांनी.

सेमीफायनलमध्ये मोहिंदर यांनी काढली इंग्लंडची हवा

पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या भारतीय संघानं आपला दबदबा सेमीफायनलमध्येही कायम राखला. पण त्यांचा सामना होता तो, इंग्लंडविरोधात. मात्र मोहिंदर अमरनाथ यांनी गोलंदाजीमध्ये कमाल दाखवत 27धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. तर, फलंदाजीमध्ये मॅच विनिंग 46 धावांची खेळी केली होती. या सामन्यात अमरनाथ यांना सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

फायनलमध्याही चालली जिमीची जादू

इंग्लंडला नमवल्यानंतर भारताचा सामना होता तो,दोनवेळा चॅम्पियन झालेल्या वेस्ट इंडिज संघाशी. इंडिजचे कर्णधार माईकर होल्डिंग यांनी टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 183 धावा करता आल्या. यात अमरनाथ यांनी 26 धावा केल्या त्याही 80 चेंडूत. खतरनाक कॅरेबियन गोलंदाजीसमोर ते एकमेक तग धरुन उभे होते.

मोक्याच्या क्षणी गोलंदाजीनं केली कमाल

फलंदाजीमध्ये आपले काम केल्यानंतर अमरनाथ यांनी गोलंदाजीमध्येही कमाल केली. 183 धावांचा पाठलाग करताना, वेस्टइंडिजनं चांगली सुरुवात केली. जेफ डुज आणि मैक्लम मार्शल यांनी 43 धावांची भागीदारी केली. ज्यामुळं भारताच्या हातातून विश्वचषक निसटणार तेवढ्याच अमरनाथ यांनी या दोन्ही फलंदाजांना बाद केले. आणि भारताला चॅम्पियन बनवले.

VIDEO : भारतीय महिला हॉकी टीमचा बसमध्ये विजयी जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 09:13 AM IST

ताज्या बातम्या