World Cup : निवृत्त हो, नाहीतर संघाबाहेर बसवू ; धोनीला मिळाला इशारा?

निवृत्तीसंदर्भात धोनीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 11:55 AM IST

World Cup : निवृत्त हो, नाहीतर संघाबाहेर बसवू ; धोनीला मिळाला इशारा?

मुंबई, 15 जुलै : ICC Cricket World सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, धोनीनं याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाही. मात्र, आता धोनीचे करिअर जवळजवळ संपत आले आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या धिम्या फलंदाजीमुळं अनेक वाद झाले, त्यामुळं चाहत्यांनी आता धोनीनं निवृत्ती घ्यावी, अशी मागणी केली होती.

न्यूझीलंड विरोधात झालेल्या सेमीफायनलमध्ये धोनीनं 72 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी धोनीनं धिम्या गतीनं फलंदाजी केली, त्यानंतर त्यांनी मोठे शॉट मारण्यास सुरुवात केली. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपमध्ये धोनीनं केलेल्या धिम्या फलंदाजीमुळं निवड समितीचे एमएसके प्रसाद याविषयी लवकरच त्याच्याशी यासंबंधी बोलणार आहेत, असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यानज जर, धोनीनं निवृत्ती घेतली नाही तर, त्याला आगामी मालिकेत संघात संधी मिळणार नाही, असे संकेत बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच, "आम्ही हैराण आहोत की धोनीनं याआधी असे कधीच केलेले नाही. ऋषभ पंत सारखे खेळाडू धोनीची जागा घेण्यासाठी सज्ज आहे. धोनी आता आक्रमक फलंदाज राहिलेला नाही. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरही त्याला संघर्ष करावा लगतो, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे", अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

धोनीच्या धिम्या फलंदाजीमुळं सचिननंही त्याच्यावर टीका केली होती. दरम्यान या कारणामुळं धोनीला वेस्ट इंडिज विरोधात खेळण्याची संधी मिळणार नाही. तर, त्याला 2020च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळं आता वेळ आली आहे की, धोनीनं स्वत: निवृत्ती जाहीर करावी.

धोनीच्या निवृत्तीवर लवकरच होणार निर्णय

बीसीसीआयच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, "वर्ल्ड कपमध्ये आम्हाला संघाचे लक्ष विचलीत करायचे नव्हते. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीवर आम्ही भाष्य केले नाही. मात्र आता धोनी संदर्भात लवकरात लवकरत निर्णय घेण्यात येईल", असे सांगितले.

Loading...

वाचा- World Cup : इंग्लंडच्या विजयानंतर पेटला वाद, ICCला दिग्गजांनी धरले धारेवर

वाचा- World Cup : इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ICCचा 'हा' नियम आहे तरी काय?

वाचा- World Cup: फायनलमध्ये पंचांनी केल्या चुका, म्हणून जिंकले इंग्लंड...

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...