World Cup : भारतीय संघानं डावललं, अंबाती रायडूला क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकत्वाची ऑफर!

वर्ल्ड कपमध्ये दोन खेळाडू जखमी होऊनही राखीव असलेल्या अंबाती रायडूला संघात स्थान मिळाले नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:14 PM IST

World Cup : भारतीय संघानं डावललं, अंबाती रायडूला क्रिकेट खेळण्यासाठी नागरिकत्वाची ऑफर!

लंडन, 03 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतानं बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. मात्र भारताच्या मधल्या फळीची चिंता कायम आहे. बांगलादेशविरोधात रोहित शर्माने 104 तर केएल राहुलनं 77 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरूवात करून दिली. मात्र, त्यानंतरही भारताचा डाव गडगडला. 1 बाद 180 मध्ये 134 धावांची भर घालण्यासाठी भारताने 8 गडी गमावले. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं भारतानं सामना जिंकला असला तरी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे योग्य पर्याय नाही.

दरम्यान सलामीवीर शिखर धवन स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आलं. धवनच्या जागी संघात विजय शंकरची वर्णी लागली. मात्र, त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली नाही. तसेच पाकिस्तानविरुद्ध वगळता शंकरला गोलंदाजीसुद्धा दिली नाही. तेव्हा त्याच्या कामगिरीवरून शंकर म्हणजे कोहलीसारखा गोलंदाज आणि बुमराहसारखा फलंदाज अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. आता विजय शंकरच दुखापतीने वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. विजयच्या जागी ऋषभ पंतला अंतिम 11 मध्ये घेतलं गेलं. इंग्लंडविरुद्ध त्याने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात 29 चेंडूत 32 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशविरुद्द 48 धावा करून पहिल्या सामन्यानंतर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. मात्र विजय शंकरच्या जागी राखीव असलेल्या अंबाती रायडूला नाही तर, मयंक अग्रवालला संघात स्थान दिले.

वर्ल्ड कपकरिता भारतीय संघाची घोषणा होत असताना अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते. आता विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर राखीव ठेवण्यात आलेल्या रायडूला नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. यावर नेटकरी बीसीसीआय चांगलेच भडकले आहेत. मात्र आता अंबाती रायडूला चक्क आइसलॅंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकत्व मिळवण्याचे नियम आणि कायदे टाकले आहेत. तसेच, "अग्रवालनं 72.33च्या सरसरीनं केवळ तीन विकेट घेतल्या आहेत त्यामुळं अंबाती तू थ्रीडी चष्मा काढू शकतोस. आम्ही जी कागदपत्रे तयार केली आहेत, त्यासाठी सादा चष्माही पुरेसा आहे. तु आमच्या देशात ये, आम्हाला तुझी कदर आहे", असे मिश्किल ट्वीट केले आहे.

Loading...

दोन खेळाडू जखमी पण रायडूला नाही मिळाली संधी

शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर पडला होता. त्यावेळी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर विजय शंकर जखमी झाल्यानंतर रायडूला संधी देण्यात आली नाही तर मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले. मयंकनं आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

वाचा- World Cup : टीम इंडियाचं सेमीफायनल चॅलेंज, भिडणार 'या' संघाशी

वाचा- टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! 'या' चार संघांच्या स्वप्नांचा केला चुराडा

वाचा- World Cup : पंचांशी हुज्जत, विराटवर होऊ शकते सामनाबंदीची कारवाई!

VIDEO: मध्य रेल्वेचा गलथानपणा प्रवाशांच्या जीवावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...