News18 Lokmat

#DhoniKeepTheGlove : का होतोय धोनीच्या ग्लोव्ह्जवरून वाद, ICCचा 'हा' नियम तुम्हाला माहीत आहे का?

धोनीच्या बलिदान या ग्लोव्ह्जमागे कोणताही राजकीय किंवा धार्मिक हेतू नव्हता, बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:19 PM IST

#DhoniKeepTheGlove : का होतोय धोनीच्या ग्लोव्ह्जवरून वाद, ICCचा 'हा' नियम तुम्हाला माहीत आहे का?

लंडन, 07 जून : भारतानं ICC World Cupमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवत मिशन वर्ल्डकपला सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी करत सर्वांचे मन जिंकले, पण चर्चा झाली ती धोनीच्या ग्लोव्ह्जची. भारताच्या गोलंदाजी दरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या ग्लोव्ह्जवर एक खास चिन्ह दिसून आले. हे चिन्ह होते, पैरा स्पेशल फोर्स या चिन्हाला बलिदान चिन्हही म्हटले जाते. क्रिकेटच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही, की कोणत्या खेळाडूनं लष्काराचे चिन्ह सामन्या दरम्यान वापरले असेल.दरम्यान पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. यामुळं धोनीची तारिफ केली जात आहे. मात्र आता या प्रकरणावरुन वादंग सुरु झाला आहे.

दरम्यान, 2011मध्ये महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. धोनीने यासोबत पॅराट्रूपिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. धोनी हा भारतीय सैनाच्या 106 पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. तर, 2015 साली प्रशिक्षण घेऊन धोनी पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच या सामन्यात धोनी हे चिन्ह परिधानकरुन मैदानात उतरला. एवढेच नाही तर, धोनीच्या किटबॅगचा रंगही लष्कराचा आहे. मात्र आयसीसीला धोनीनं लष्कराच्या रंगाचा किटबॅट वापरण्यावर आक्षेप नाही. मात्र ग्लोव्ह्जवरुन आयसीसीनं बीसीसीआय आणि धोनीला फैलावर घेतले आहे.

ICCनं बीसीसीआयकडे केली हे चिन्हा काढण्याची मागणी

या सगळ्या प्रकरणावर आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे.

काय आहे ICCचा नियम

Loading...

आयसीसीच्या जी1 नियमानुसार, खिलाडी किंवा टीम अधिकारी लष्करी बॅंड किंवा कपडे किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये व्यक्तिगत संदेश देऊ शकत नाही. जर तसे करायचे असल्यास त्याकरिता क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसी यांची संमती असणे गरजेचे आहे. राजकिय, धार्मिक किंगा रंगभेद यावरील वक्तव्य किंवा कृतीसाठी बोर्ड परवानगी देत नाही. जर कोणत्या एका खेळाडूला बोर्डनं मंजूरी दिली असली तरी आतंरराष्ट्रीय सामन्यात त्यांना या गोष्टी प्रदर्शित करण्याची संमती नसते.

बीसीसीआयनं दिले स्पष्टीकरण

या सर्व प्रकरणावर बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टीकरण दिले आहे की, धोनीच्या बलिदान या ग्लोव्ह्जमागे कोणताही राजकीय किंवा धार्मिक हेतू नव्हता. त्यामुळं आता धोनीनं हे ग्लोव्ह्ज वापरायचे की नाही, याच अंतिम निर्णय आयसीसीकडे असणार आहे. BCCI प्रशासक विनोद राय यांनी ANIला दिलेल्या प्रतिक्रियेत, “आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ”, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी प्रशासक विनोद राय यांना माध्यमांनी या वादावर प्रश्न विचारला. यावर विनोद राय म्हणाले, आम्ही यासंदर्भात आयसीसीकडे परवानगी मागितली आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर भाष्य करु.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले


VIDEO : World Cup मध्ये भारताचे सामने फिक्स? पहिल्या विजयानंतर 'या' अफवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...