World Cup : धोनी पाठोपाठ 'युनिवर्सल बॉस'लाही ICCचा झटका, स्टीकर लावण्यास घातली बंदी

World Cup : धोनी पाठोपाठ 'युनिवर्सल बॉस'लाही ICCचा झटका, स्टीकर लावण्यास घातली बंदी

महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जनंतर आता गेलच्या लोगोलाही बंदी.

  • Share this:

लंडन, 10 जून : ICC Cricket World Cupमध्ये महेंद्रसिंग धोनीला बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरण्यावरून वाद झाले होते. आयसीसीनं ग्लोव्ह्जवर बंदी घातल्यानंतर चाहत्यांनी आयसीसीवर टीका केली होती. आता वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवरही बंदी घालण्यात आली आहे. स्वत:ला 'युनिवर्सल बॉस' म्हणून म्हणवणारा गेलनं याच नावाचा लोगो आपल्या जर्सीवर वापरण्याची परवानगी आयसीसीकडे मागितली होती. धोनीच्या ग्लोव्ह्ज प्रकरणानंतर आयसीसीनं गेलची ही मागणी नाकारली. आयसीसीनं कोणताही व्यक्तिगत संदेश कपड्यावर किंवा खेळण्याच्या उपकरणावर वापर करण्यावर बंदी घातली आहे.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीनं धोनीबाबत घेतलेला निर्णय हा गेलबाबतीतही लागू झाला. त्यामुळं जर धोनी बलिदान लोगो असलेले ग्लोव्ह्ज वापरू शकत नाही तर, गेलली कोणताही वैयक्तिक लोगो वापरू शकत नाही.

बलिदान ग्लोव्ह्जवरुन आयसीसी विरुद्ध भारतीय चाहते भिडले

दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं बलिदान चिन्ह असलेल्या ग्लोव्ह्जचा वापर केला होता. दरम्यान यावरुन वादंग सुरु झाल्यानंतर आयसीसीनं धोनीच्या या ग्लोव्ह्जवर बंदी घातली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात धोनीनं हे ग्लोव्ह्ज वापरले नव्हते. आता गेलच्या लोगोमुळं नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

काय आहे ICCचा नियम

आयसीसीच्या जी1 नियमानुसार, खिलाडी किंवा टीम अधिकारी लष्करी बॅंड किंवा कपडे किंवा कोणत्याही इव्हेंटमध्ये व्यक्तिगत संदेश देऊ शकत नाही. जर तसे करायचे असल्यास त्याकरिता क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसी यांची संमती असणे गरजेचे आहे. राजकिय, धार्मिक किंगा रंगभेद यावरील वक्तव्य किंवा कृतीसाठी बोर्ड परवानगी देत नाही. जर कोणत्या एका खेळाडूला बोर्डनं मंजूरी दिली असली तरी आतंरराष्ट्रीय सामन्यात त्यांना या गोष्टी प्रदर्शित करण्याची संमती नसते.

वाचा-World Cup : मैदान तर जिंकलं, पण चाहत्यांच्या 'या' कृतीमुळे विराटनं मागितली स्मिथची माफी

वाचा- Point Table : विराटसेनेची विजयी घौडदौड, पण गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर 'हा' संघ

वाचा-20 साल बाद... ओव्हलवर त्या खेळीची आठवण पुन्हा ताजी

वाचा-  World Cup : ‘ही’ आकडेवारी सांगते विराटसेनाच होणार जग्गजेता !

VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान

First published: June 10, 2019, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading