IND vs NZ : हा सामना रद्द झाला तर ICCवर ओढावणार नामुष्की

IND vs NZ : हा सामना रद्द झाला तर ICCवर ओढावणार नामुष्की

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच याआधी तीन सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.

  • Share this:

ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या सामन्यावर आता पावसाचे संकट आहे. विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघावर पावसामुळं बिकट परिस्थिती येणार आहे. आज सामना होत असलेल्या ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सामना होणार की नाही, हा प्रश्न चाहत्यांपुढे आहे.

वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होणार आहे. न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत तीनही सामने जिंकले आहेत, त्यामुळं गुणतालिकेत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर, भारताचा संघ दोन सामने जिंकत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे आज वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा गेले दोन दिवस रंगत आहे आणि आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास पाऊसच हावी होईल, असे चित्र आहे.

तसेच, पाऊस थांबला तरी, सामना होणार की नाही याबाबत प्रश्न कायम आहे. कारण हर्षा भोगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस थांबला तरी, मैदान सुखण्यासाठी सुर्यप्रकाश नसल्यामुळं मैदान सुखवणार कसे, हा प्रश्न कायम आहे. तसेच सध्या नॉटिंगहममध्ये थंड वातावरण असल्यामुळं खेळाडूंनाही या वातावरणाचा त्रास होणार आहे.



आयसीसीवर ओढावणार नामुष्की

इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला. या सामन्याचे केवळ 7.3 ओव्हर खेळले गेलेय आता मंगळवारी पुन्हा एकदा पावसामुळं सामना रद्द झाला. श्रीलंका संघाचे यंदाच्या वर्ल्ड कपमधले 4 सामन्यांपैकी 2 सामने पावसामुळं रद्द झाले आहे. यात आता भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्यावरही पावसाचे संकट आहे. दरम्यान, पावसाचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या सामन्यांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आयसीसीवर टीका होताना दिसत आहे. त्यामुळं पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही चाहतेही विचारत आहेत. यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी, ''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'', असे स्पष्टीकरण दिले आहे.

...तर सामना 50 ओव्हरचा होणार नाही

सध्या पंचाच्या निरीक्षणाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. त्यामुळं आता नाणेफेकही उशीरानं होणार आहे. दरम्यान पावसानं पुन्हा व्यत्यय आणला तर, सामना 50 ओव्हरचा होणार नाही. कमी षटकारांचा सामना खेळला जाऊ शकतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.

पावसाची खेळी महत्त्वाची

गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस होत आहे. पावसामुळं भारताला सरावही करता आला नाही. जर हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. मात्र चाहत्यांची पुरती निराशा होणार आहे.

वाचा- पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही ?, EXCLUSIVE बातमी

वाचा-…म्हणून वर्ल्ड कपमध्ये रिझर्व्ह डे नाही, आयसीसीनं दिलं पत्राद्वारे उत्तर


SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 04:10 PM IST

ताज्या बातम्या