World Cup : VIDEO - खेळाडूंसह पंचही झोपले मैदानावर, प्रेक्षकांना हसू अनावर

ICC Cricket World Cup दक्षिण आफ्रिका आणि लंकेच्या सामन्यावेळी असा प्रकार होण्याची ही दुसरी वेळ आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 08:28 PM IST

World Cup : VIDEO - खेळाडूंसह पंचही झोपले मैदानावर, प्रेक्षकांना हसू अनावर

लीडस्, 28 जून : ICC Cricket World Cup दक्षिण आफ्रिका आणि लंकेच्या सामन्यावेळी अचानक मधमाशांनी मैदानात एंट्री मारली. त्यामुळे फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि पंच मैदानावरच झोपले. लंकेचा संघ फलंदाजी करत असताना 48 व्या षटकात अचानक मधमाशांनी मैदानात शिरकाव केला. त्यावेळी मैदानातील खेळाडू आणि पंच झोपल्याचं पाहून सर्वांना एक क्षण काहीच कळेना. नंतर जेव्हा मधमाशांमुळे हा प्रकार सुरु असल्याचं समजताच प्रेक्षकांनाही हसू आवरले नाही.

क्रिकेटच्या इतिहासात याआधीही मधमाशांनी हल्ला केला होता. 2017 मध्येसुद्धा आफ्रिका आणि लंकेच्या सामन्यावेळी मधमाशा मैदानावर आल्या होत्या. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यावेळी मधमाशांमुळे सामना थांबवावा लागला. मात्र, कोणालाही मधमाशांनी चावा घेतला नाही.

दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लंकेला 50 षटकांत 203 धावांत रोखलं. लंकेकडून कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांनी प्रत्येकी 30 धावा केल्या. त्याशिवाय डीसिल्वाने 24, मेंडीसने 23 आणि थिसारा परेराने 21 धावा केल्या. आफ्रिकेच्या ड्वेन प्रेटोरिअस, रबाडा आणि ख्रिस मोरिसच्या गोलंदाजीसमोर लंकन फलंदाज ढेपाळले. प्रेटोरिअस आणि मॉरिसने प्रत्येकी 3 तर रबाडाने दोन बळी घेतले. पेह्लुक्वायो आणि ड्युमिनी यांनी एक गडी बाद केला.

Loading...

दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडविरुद्ध धक्कादायक विजय मिळवून श्रीलंकेने वर्ल्ड कपमध्ये आपले आव्हान टिकवले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ते, सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहतील.

श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध 20 धावांनी आश्चर्यकारक विजय मिळवल्यामुळे उपांत्य फेरीसाठीची स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांमध्ये लढत आहे. श्रीलंकेचा संघ सध्या 2 विजयांसह सहा गुण मिळवून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामने जिंकले, तरच त्यांना उपांत्य फेरी गाठता येऊ शकेल.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड कपमध्ये केवळ एक सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रतिष्ठेसाठी हा सामना लढेल. दरम्यान हा सामना श्रीलंकेनं जिंकल्यास सेमीफायनलची लढाई आणखी तीव्र होणार आहे.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 08:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...