ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या सामन्यावर आता पावसाचे संकट आहे. विजयाची हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघावर पावसामुळं बिकट परिस्थिती येणार आहे. आज सामना होत असलेल्या ट्रेंट ब्रीज स्टेडियमवर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सामना होणार की नाही, हा प्रश्न चाहत्यांपुढे आहे. मात्र, या सामन्याआधी भारताचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्यानं आपली इच्छा व्यक्त केली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होण्याआधी हार्दिक पांड्यानं आपली वर्ल्ड कपमधली एक इच्छा व्यक्त केली. आयसीसीनं टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यानं, “माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे 14 जुलै रोजी आपल्याला वर्ल्ड कप उचलून घ्यायचा आहे”, असे सांगितले आहे. या मुलाखतीत त्यानं या भावना व्यक्त केल्या.
तसेच पाड्यानं, “भारतीय संघासाठी खेळणं माझा श्वास अहे, आणि हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे असेही सांगितले. तसेच यावेळी त्यानं पुढच्या काही आठवड्यांसाठीचा आपला प्लॅनही सांगितला. हा प्लॅन म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे”. या मुलाखतीत त्यानं, “मी असा खेळाडू आहे जो खेळावर प्रचंड प्रमे करतो. मी प्रत्येक सामने चिकाटीनं खेळतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून आता ती वेळ आली आहे”, असेही म्हटले आहे. हार्दिक पांड्याला सध्याच्या भारतीय संघातीक कपिल देव म्हटलं जाते. कारण हार्दिक जेवढ्या आक्रमकतेने फलंदाजी करतो, तेवढीच त्याची गोलंदाजीही चांगली आहे.
Hardik Pandya: "I'm a happy soul. I like to be happy, no matter what happens in my life."
— ICC (@ICC) June 13, 2019
Ravindra Jadeja: "He's kind of a rockstar, I would say."
Find out what makes India's heavy metal all-rounder tick. #CWC19 pic.twitter.com/YFUWN8EOu0
दरम्यान भारतानं 2011चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा हार्दिक आपल्या मित्रांसमवेत नाचत होता, आणि आज तो भारतीय संघात खेळत आहे. कदाचित यालाच स्वप्नपुर्ती म्हणताता. याबाबत हार्दिकनं, “14 जुलै रोजी वर्ल्ड कप माझ्या हाती हवा आहे. आजही जेव्हा मी 2011च्या वर्ल्ड कपची आठवण काढतो, तेव्हा अंगावर काटा येतो. वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न आहे, आणि मी माझं स्वप्न पूर्ण करेन अशी मला आशा आहे’, असेही त्यानं म्हटलं आहे.
भारतानं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत, गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. आज न्यूझीलंडला हरवण्याची भारतीय संघाकडे संधी असली तरी, पावसामुळं हा सामना होणार आहे की नाही याबाबत साशंकता आहे.
...तर सामना 50 ओव्हरचा होणार नाही
सध्या पंचाच्या निरीक्षणाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. त्यामुळं आता नाणेफेकही उशीरानं होणार आहे. दरम्यान पावसानं पुन्हा व्यत्यय आणला तर, सामना 50 ओव्हरचा होणार नाही. कमी षटकारांचा सामना खेळला जाऊ शकतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.
पावसाची खेळी महत्त्वाची
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस होत आहे. पावसामुळं भारताला सरावही करता आला नाही. जर हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. मात्र चाहत्यांची पुरती निराशा होणार आहे.
वाचा- पाऊस थांबला तरी मॅच होणार नाही ?, EXCLUSIVE बातमी
वाचा- विराटच्या स्वप्नावर पावसाचे पाणी, सचिनच्या विक्रमापासून दूरच!
वाचा-IND vs NZ : हा सामना रद्द झाला तर ICCवर ओढावणार नामुष्की
SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!