लंडन, 27 मे : आयसीसी विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ सध्या विश्वचषकासाठी जय्यत तयारी करत आहे. यात विराट सेनेच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळणाऱ्या भारतीय संघाचे सर्वच खेळाडू सध्या संघ बांधणीवर भर देत आहेत. 30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा सामना 5 जूनला होणारा आहे. यंदाच्या विश्वचषकाकरिता विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची जागा संघातील पक्की झाली आहे. मात्र सध्या विश्वचषकात सर्वच खेळाडू सराव करत आहेत.
एकीकडे भारतीय संघ जोमाने सराव करत असताना, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वेगळीच चुरस रंगली आहे. हार्दिक आणि बुमराह सध्या steady hand challengeमध्या व्यस्त आहेत. या चॅलेंजमध्ये इलेक्ट्रोफाईड पाईपमधून चलाखीने एक वस्तू फिरवणे आणि त्याचा स्पर्श त्या पाईपला होऊ न देणे महत्त्वाचे असते. त्यामुळं या दोघांमध्ये या स्पर्धेवरुन चुरस रंगली आहे.
's @hardikpandya7 says he's a beginner and @Jaspritbumrah93 is the pro!
— ICC (@ICC) May 26, 2019
Does the #SteadyHandChallenge follow that narrative though? #cwc19icc pic.twitter.com/eGGPOMXwfE
दरम्यान याआधी भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा यानेही हे चॅलेंज पूर्ण करण्याचे प्रयत्न केले होते. रोहितनं बुमराह आणि हार्दिकलाही मागे टाकले होते. मात्र अजूनपर्यंत कोणालाही हे चॅलेंज पुर्ण करता आलेले नाही.
Watch Hitman @ImRo45 takes the steady hand challenge
— BCCI (@BCCI) May 24, 2019
More coming up on https://t.co/uKFHYe2Bag pic.twitter.com/hmHIattnMN
दरम्यान भारतीय संघ 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहेत. तर, मंगळवारी बांगलादेश विरोधात दुसरा सराव सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताला न्युझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला.
असे असतील भारताचे सामने
5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)
9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)
13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)
16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)
22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)
27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)
30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)
2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)
6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)
वाचा-World Cup : रोहितला शहाणपणा शिकवण्याआधी हे वाचा...
वाचा-भेलपुरीवाल्याकडून आईला समजला मुलाचा सहा षटकारांचा पराक्रम
वाचा-World Cup : 'भगव्या रंगाची जर्सी, हा तर भाजप लाटेचा परिणाम'
वाचा-World Cup : पाकिस्तानचा कर्णधार विराटसेनेला घाबरला, सामन्याआधीच पराभवाची भीती
VIDEO कोण बिघडवतंय औरंगाबादची शांतता? पाहा स्पेशल रिपोर्ट