Happy Birthday Dhoni : टीम इंडिया असा साजरा करणार धोनीचा बर्थ डे, रोहितनं सांगितला प्लॅन

धोनीनं वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 188 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:35 AM IST

Happy Birthday Dhoni : टीम इंडिया असा साजरा करणार धोनीचा बर्थ डे, रोहितनं सांगितला प्लॅन

लंडन 07 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर सेमीफायनलचे तिकीट मिळवले. साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यातही श्रीलंकेवर भारतानं एकहाती विजय मिळवला. त्यामुळं गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात भिडणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचे शतक, धोनीनं विकेटच्या मागे घेतलेले तीन जबरदस्त कॅच यांच्या जोरावर भारतानं सामना जिंकला. त्यामुळं विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणारा भारतीय संघ खुश आहे. यातच सामन्यानंतर रोहितनं पत्रकारांशी बोलताना धोनीला त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या.

भारताचा माजी कर्णधार, फिनीशर आणि कॅप्टन कुल या नावाने प्रसिध्द असलेला महेंद्रसिंग धोनी आज 38व्या वर्षात पदार्पण करत आहे. 2005मध्यो धोनीनं श्रीलंकेविरोधात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर, 2004मध्ये बांगलादेशविरोधात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2014मध्ये धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान सध्या धोनी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे, त्यामुळं त्याचा वाढदिवस भारतीय संघाबरोबरच साजरा करेल.

दरम्यान रोहितनं रात्री धोनीचा वाढदिवस कसा साजरा करणार याबाबत माहिती दिली. भारत आपला सेमीफायनलचा सामना मॅंचेस्टरमध्ये खेळणार आहे. त्यामुळं प्रवासात केक कापून धोनीचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

Loading...

धोनीनं वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 188 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने भारतीय संघाकडून आतापर्यंत 348 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 50.58च्या सरासरीने 10 हजार 723 धावा केल्या आहेत. वनडेत त्याने 10 शतके तर 72 अर्धशतक केली असून 183 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. टीम इंडियाकडून त्याने 228 षटकार मारले आहेत. धोनीने 90 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 38.09च्या सरासरीने 4 हजार 876 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने एक द्विशतक, 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. 224 ही त्याची कसोटीमधील सर्वोच्च खेळी आहे. टी-20 प्रकारात धोनीने 98 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या प्रकारात त्याने 37.6च्या सरासरीने 1 हजार 617 धावा केल्या आहेत. टी-20त त्याने केवळ 2 अर्धशतकी झळकावली आहेत. 56 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2019 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...