World Cup : सेमीफायनलआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दोन प्रमुख खेळाडू जखमी

World Cup : सेमीफायनलआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दोन प्रमुख खेळाडू जखमी

ऑस्ट्रेलिया लीग स्टेजमधला आपला शेवटचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळणार आहे.

  • Share this:

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आता लीग स्टेजमधील सामने संपले आहेत, त्यामुळं आता सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र आता या सामन्यांआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. त्यातील एक खेळाडू वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघा सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

मंगळवारपासून सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू शॉन मार्श दुखापतींमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. ओल्ड ट्रैफर्डमध्ये नेटमध्ये सराव कराताना त्याला दुखापत झाली होती, त्याच्या जागी पीटर हैंड्सकॉम्बला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलही जखमी झाला आहे.

सराव करताना जखमी झाले खेळाडू

ऑस्ट्रेलिया आपला शेवटचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळणार आहे. नेटमध्ये या सामन्याचा सराव करताना शॉन मार्शच्या कंबरेला दुखापत झाली. त्याच्या हातालाही फ्रॅक्चर झाले आहे. याबाबत प्रशिक्षक जस्टिन लंगेर यांनी, "मार्शची जखम गंभीर असल्यामुळं तो वर्ल्ड कप बाहेर गेला आहे", अशी माहिती दिली. वर्ल्ड कपमध्ये मार्शने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळले आहेत.

मॅक्सवेलही झाला जखमी

दक्षिण आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाड ग्लेन मॅक्सवेलही जखमी झाला आहे. मात्र त्याची दुखापत गंभीर नसल्यामुळं तो सामना खेळू शकतो. मात्र जर सेमीफायनलमध्ये तो खेळू शकला नाही तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढणार आहेत.

वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

First published: July 5, 2019, 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading