World Cup : वर्ल्ड कपमधील सर्वात खळबळजनक आरोप, पाकिस्तानबद्दल माजी खेळाडूचा दावा

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 12:18 PM IST

World Cup : वर्ल्ड कपमधील सर्वात खळबळजनक आरोप, पाकिस्तानबद्दल माजी खेळाडूचा दावा

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी पाकिस्तानला आज बांगलादेशविरोधात सामना मोठ्या धावसंख्येने जिंकावा लागणार आहे. दरम्यान इंग्लंडनं बुधवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. मात्र यामुळं पाकिस्तानचे स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळं आता सेमीफायनलमधले चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत.

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला केलेल्या खराब कामगिरीमुळं पाकिस्तान संघाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडनं पाकिस्तानला मोठा झटका देत, त्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर केले. यावर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं दुसऱ्या संघांवर फिक्सिंगचा आरोप केला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांने आरोप लगावला आहे की, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला सामना फिक्स होता. लतीफ यांने दावा केला आहे की, "या दोन्ही संघाचा खेळ पाहता त्यांचे आव्हान पाकिस्तानला सेमीफायनलमधून बाहेर काढणे एवढेच होते". पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. "जेव्हा न्यूझीलंडच्या 4 विकेट गेल्या होत्या. तेव्हा मॉर्गननं आदिल रशीद आणि जो रुट यांच्याकडून गोलंदाजी करून घेतली, कारण न्यूझीलंड कमी धावांनी हरेल. त्याचबरोबर इंग्लंडनं खुप धिम्या गतीनं फलंदाजी करत 370पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत", असेही राशिदनं सांगितले.

'भारताला पाकिस्तान सेमीफायनलमध्ये नको'

रशीदनं भारत-इंग्लंड सामन्यावरही आरोप लगावले. "भारताला पाकिस्तान सेमीफायनलमध्ये नको म्हणून ते मुद्दाम सामना हरले. भारत हा सामना जिंकू शकले असले पण त्यांनी तशी खेळी केली नाही", असा आरोप भारतावर केला.

बांगलादेशविरोधात असा असेल पाकिस्तानचा प्लॅन

Loading...

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात खराब प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तान संघाला बांग्लादेशविरोधात गेल्या चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 316 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. यावर अहमदनं अजब विश्वास व्यक्त केला, "जर अल्लाहच्या मनात असेल तर चमत्कार होईल. ते असे आहे की 600, 500, 400 धावा करून त्याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला ५० धावांत बाद केल्यानंतरच 136 धावांच्या फरकाने विजय मिळवता येईल". बांगलादेशला पाकिस्तान विरोधात प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ्यावा लागेल. तसेच, त्यांना 500 धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे.

वेस्ट इंडिजनं बिघडवला पाकिस्तानचा खेळ

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकला नमवले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावात बाद झाला होता. त्यामुळं पाकिस्तानचा रनरेट मायन्समध्ये गेला. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तर, श्रीलंकेच्या संघाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला.

वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

वाचा- 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर

World Cup: भर मैदानात निर्वस्त्र शिरला चाहता, सामन्यात घातला धिंगाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...