IND vs WI : वेस्ट इंडिजचे 'हे' 5 धोकादायक खेळाडू भारताला देतील पराभवाचा धक्का

भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं वेस्ट इंडिज हे पाच खेळाडू भारतासाठी ठरणार धोकादायक.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 01:38 PM IST

IND vs WI : वेस्ट इंडिजचे 'हे' 5 धोकादायक खेळाडू भारताला देतील पराभवाचा धक्का

ICC Cricket World Cupमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होत आहे. भारतीय संघानं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. त्यामुळं वेस्ट इंडिजचे हे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.

ICC Cricket World Cupमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होत आहे. भारतीय संघानं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवत सेमिफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र वेस्ट इंडिजला नमवणे, भारतासाठी सोपे असणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. त्यामुळं वेस्ट इंडिजचे हे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.
वेस्ट इंडिजचा स्पोटक फलंदाज आणि युनिवर्सल बॉस म्हणून चर्चेत असलेला ख्रिस गेलचे नाव या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गेल हा असा फलंदाज आहे, जो एकटा सामना पलटू शकतो. न्यूझीलंड विरोधात त्यानं 87 धावांची खेळी केली होती. त्यामुळं भारतीय गोलंदाजांना गेलला रोखण्यासाठी विशेष रणनीती आखण्याची गरज आहे.

 वेस्ट इंडिज संघाचा कार्लोस ब्रॅथवेटने काय करू शकतो हे आपण न्यूझीलंड विरोधाच पाहिले आहे. ब्रॅथवेटनं आपल्या 101 धावांची खेळीनं न्यूझीलंड विरोधात शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष केला होता. त्यामुळं हा आक्रमक फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

वेस्ट इंडिजचा दुसरा सलामीचा फलंदाज शाई होप याच्या फलंदाजाची चर्चा वर्ल्ड कपच्या आधीपासून आहे. शाईनं 6 सामन्यात 187 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये त्याला आतापर्यंत चांगली फलंदाजी करता आली नसली तरी, तो आजच्या सामन्यात चांगली फलंदाजी करू शकतो.

वेस्ट इंडिच्या मधल्या फळीचा कणा म्हणजे शिमरॉन हेटमायर. न्यूझीलंड विरोधात त्यानं 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. गेलच्या साथीनं त्यानं शतकी भागिदारीही केली होती. आयपीएलमध्ये या फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नसली तरी, हा युवा फलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

फलंदाजानंतर गोलंदाजीविषयी बोलायचे झाल्याल वेस्ट इंडिजकडे शेल्डन कॉटरेल भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. कॉटरेलनं 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंविरोधातही त्यांने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं भारताच्या सलामीच्या फलंदाजांना सावध फलंदाजी करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...