ICC वर सचिन नाराज, फूटबॉलच्या धर्तीवर सुचवला 'हा' उपाय!

ICC च्या नियमामुळे सुपर ओव्हरमध्येसुद्धा सामना टाय झाल्यानंतर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. यानंतर जगभरातून दिग्गजांनी ICC ला धारेवर धरलं आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंड आणि इंग्लंडचा सामना 50 षटकांत आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. अखेर सुपर ओव्हरच्या नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. यावर आयसीसीला जगभरातील दिग्गजांनी धारेवर धरलं आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आय़सीसीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीचा वर्ल्ड कप फायनलमध्ये चौकार-षटकारांच्या आधारे विजेता निवडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सचिनने म्हटलं आहे.

सचिनने त्याच्या अॅपवरून बोलताना सांगितलं की, मला वाटतं की दोन्ही संघांच्या चौकार-षटकारांच्या संख्येपेक्षा आणखी एक सुपर ओव्हर खेळवून विजेत्याचा निर्णय व्हायला हवा होता. फुटबॉलमध्ये एक्स्ट्रा टाइममध्ये सामना जातो तेव्हा  त्यांच्या आधीच्या खेळाचा विचार केला जात नाही. तसाच नियम क्रिकेटमध्येही व्हायला हवा.

सचिनने वर्ल्ड कपच्या फॉरमॅटमध्येही बदलाची गरज असल्याचं सांगितलं. बाद फेरीत टॉप २ संघांच्या चांगल्या कामगिरीचा त्यांना फायदा व्हायला हवा असं म्हटलं आहे. याआधी विराट कोहलीनेसुद्धा बाद फेरीत आयपीएलप्रमाणे सामने व्हायला हवेत असं म्हटलं होतं.

लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात वादग्रस्त ठरलेल्या थ्रोबद्दल आयसीसीनेसुद्धा बोलण्यास नकार दिला. त्याशिवाय पंचांच्या निर्णयावरही आयसीसीकडून मौन बाळगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 09:04 AM IST

ताज्या बातम्या