World Cup : जग्गजेता ठरवणारी सुपर ओव्हर, पाहा व्हिडिओ

ICC Cricket World Cup : आर्चरच्या एका चुकीनंतरही इंग्लंडने विजय मिळवला. यामुळे सलग न्यूझीलंडला सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 12:38 AM IST

World Cup : जग्गजेता ठरवणारी सुपर ओव्हर, पाहा व्हिडिओ

लॉर्ड्स, 15 जुलै : सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर इंग्लंडने बाजी मारली. त्यांनी पहिलं वहिलं विजेतेपद पटकावलं. न्यूझीलंडला मात्र सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांना फलंदाजीला पाठवले. त्यांनी सहा चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडनेसुद्धा 15 धावा केल्या. मात्र, सुपर ओव्हरच्या नियमानुसार इंग्लंड विजेता ठरले.

न्यूझीलंडचे नीशाम आणि गुप्टील फलंदाजीला मैदानात उतरले होते. तर जोफ्रा आर्चरनं सुपर ओव्हर टाकली. त्यानं पहिला चेंडू वाइड टाकला. त्यानंतरच्या चेंडूवर नीशामनं दोन धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर निशामनं षटकार खेचला. तिसऱ्या-चौथ्या चेंडूवर निशामने दोन दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर त्याला एकच धाव काढता आली. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावा हव्या असताना गुप्टीलने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र एक धाव काढल्यानंतर तो धावचीत झाला आणि इंग्लंडने विजय मिळवला.

तत्पूर्वी, इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जोस बटलर फलंदाजीला उतरले होते. तर न्यूझीलंडने सुपर ओव्हरसाठी ट्रेंट बोल्टला चेंडू सोपवला होता. स्टोक्सनं पहिल्याच चेंडूवर 3 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बटलरने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सनं चौकार मारला आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर बटलरने 2 धावा घेतल्या आणि अखेरच्या चेंडूवर चौकार मारला.

त्याआधी 50 षटकांत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 241 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडनेसुद्धा 8 बाद 241 धावा केल्या.

Loading...

VIDEO : औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं पटकावला 'क्लासिक मिस्टर इंडिया' किताब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 12:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...