ओव्हर थ्रोचा वाद : स्टोक्स पंचांना म्हणाला होता, मला नकोत चार धावा

ओव्हर थ्रोचा वाद : स्टोक्स पंचांना म्हणाला होता, मला नकोत चार धावा

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ओव्हर थ्रोच्या वादावर मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:

लॉर्ड्स, 17 जुलै : ICC Cricket World Cup च्या अंतिम सामन्यात ओव्हर थ्रोचा वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. जगभरातील क्रिकेटप्रेमींसह दिग्गजांनी पंचांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. पंचांच्या चुकीमुळं न्यूझीलंडचं विजेतेपद हुकलं. आता याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. असं म्हटलं जात आहे की, बेन स्टोक्सनं पंचांकडे ओव्हर थ्रोच्या चार धावा मागे घ्या म्हणून सांगितलं होतं.

इंग्लंडला विजेता होण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा बेन स्टोक्स मात्र दुखी आहे. त्याने विजेतेपद मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तेव्हा त्यानं जाहीरपणे मी आयुष्य़भर केन विल्यम्सनची माफी मागत राहिन असं म्हटलं होतं.

बेन स्टोक्सबद्दल इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटलं आहे की, पंचांनी जेव्हा ओव्हर थ्रोवर चौकार दिला तेव्हा स्टोक्सने पंचांना तो चौकार मागे घ्या असं सांगितलं. थ्रो केल्यावर जर चेंडू आपल्याला लागल्यास त्यावर धाव घेणं खिलाडूवृत्तीत बसत नाही. पण जेव्हा चेंडू लागून तो सीमारेषेबाहेर गेल्यास नियमानुसार धावा मिळतात. त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही असंही अँडरसनने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

ओव्हर थ्रो बॅटला लागून गेला चौकार

अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात तीन चेंडूत इंग्लंडला 9 धावांची गरज होती. तेव्हा डीप मिडविकेटवरून गुप्टिलनं केलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी दुसरे पंच इरासमुस यांच्याशी चर्चा करत, इंग्लंडला सहा धावा दिल्या. यात दोन धावा खेळाडूंनी धावत काढल्या तर, चार धावा ओव्हरथ्रोच्या मिळाल्या. या सहा धावांमुळं 242 धावांचा पाठलाग करणारा इंग्लंड 241 धावा करू शकला. त्यामुळं हा सामना टाय झाला.

शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

'सहा नाही पाचच धावा'

ओव्हर थ्रोच्या धावा देताना पंचांकडून चुक झाल्याचं माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टफेल यांनीही म्हटलं. ओव्हर थ्रोवर सहा धावा नाही तर पाच धावाच द्यायला हव्या होत्या असंही स्पष्ट केलं. टफेल यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट प्रेमींनी आयसीसीनं पुन्हा विचार करावा आणि अजुनही वेळ गेलेली नाही असं म्हटलं आहे.

ओव्हर थ्रोसाठी नियम

ओव्हर थ्रोसाठी आयसीसीनं दिलेल्या 19.8 नियमानुसार जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळं जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. मात्र जर, फलंदाजानं थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. त्यामुळं जेव्हा गुप्टिलनं थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुळं दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. त्यामुळं पंचाच्या एका चूकीमुळं न्यूझीलंडला वर्ल्ड कप गमवावा लागला.

भारताचा प्रशिक्षक कसा हवा? BCCI ने घातल्या 'या' अटी

First published: July 17, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या