World Cup मध्ये ICC परंपरा मोडून लॉर्डसवर रचणार इतिहास?

World Cup मध्ये ICC परंपरा मोडून लॉर्डसवर रचणार इतिहास?

ICC Cricket World Cup स्पर्धेतील अंतिम सामना 14 जुलैला लॉर्ड्सवर होणार आहे.

  • Share this:

लंडन, 07 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेत अंतिम सामन्याला एक आठवडा उरला आहे. सेमीफायनलमध्ये चार संघ निश्चित झाले असून मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तर गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. यातील विजेत्या संघांचा अंतिम सामना रविवारी लॉर्ड्सवर होणार आहे. जग्गजेत्या संघाला आयसीसी प्रमुख ट्रॉफी देण्याची परंपरा आहे. आता त्यांच्याऐवजी दिग्गज क्रिकेटपटूच्या हस्ते ट्रॉफी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या नियमानुसार आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर विश्वविजेत्यांना ट्रॉफी देतील. मात्र, यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मायकल क्लार्क नव्या विजेत्यांना ट्रॉफी देईल. याशिवाय ब्रिटनच्या राजघराण्यातील एखाद्या सदस्यामार्फतही ट्रॉफी दिली जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये परंपरा खंडीत करत आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांच्याऐवजी चेअरमन एन श्रीनिवासन यांनी ट्रॉफी दिल्यानं वाद निर्माण झाला होता. आता अशी चर्चा आहे की, कोणत्याही दिग्गज क्रिकेटपटूच्या हस्ते ट्रॉफी दिली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातून कोणत्याही सदस्याची परवानगी मिळण्यास वेळ लागू शकतो. आयसीसीने निमंत्रण दिलेलं असली तरी ते स्वीकारल्यानंतर पुढचे नियोजन ठरेल.

World Cup : पाकला बाहेर काढण्यासाठी भारत हरला का? सर्फराजनं दिलं उत्तर

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पंचांच्या खराब कामगिरीवरून आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामाही दिला होता. यामुळे एन श्रीनिवासन यांनी ऑस्ट्रेलियाला ट्रॉफी दिली होती.

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

यंदा सचिन तेंडुलकरच्या हस्ते वर्ल्ड कप दिला जावा यासाठी समर्थन देणारा प्रस्ताव आहे. याशिवाय असंही सांगितलं जात आहे की सचिन युनिसेफचा सदिच्छादूत आहे. आयसीसी आणि युनिसेफचे चांगले संबंध आहेत. तसेच गतविजेत्या संघाच्या कर्णधाराकडून नव्या विजेत्या संघाला ट्रॉफी दिली जावी असा विचारही मांडण्यात आला आहे.

SPECIAL REPORT : दिल्लीनंतर थेट शेती, नवनीत राणांची अशीही बांधिलकी!

First published: July 7, 2019, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading